Marathwada Muktisangram Special Report: मराठा मुक्तिसंग्रामचं राजकीय गणित!
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यंदाही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी गैरहजर राहणार आहेत... अमेरिकच्या परराष्ट्र विभागाने जलील यांना अभ्यास दौऱ्यासाठी आमंत्रित केलंय. त्यामुळे जलील १० ते २० सप्टेंबर या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर आहेत.. त्यामुळे १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला जलील यांची दांडी असणार आहे... आमदार असतानाच्या पाच वर्षाच्या कालावधीत जलील मुक्तीसंग्राम दिनाला हजर राहिले नाहीत.. खासदार झाल्यानंतरही एकदा दोनदा ते या कार्यक्रमात उपस्थित राहिले... त्यामुळे जलील यांच्यावर सातत्याने टीका होतेय.. त्यातच एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याची मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केलीय. त्यामुळे मराठवाडा मुक्तीसंग्रामाला जलील यांच्या गैरहजेरीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्यात...