(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satara : साताऱ्यात 24 तासात बांधला 39 किमीचा रस्ता ; अजित पवारांकडून कौतुक
चोविस तासात तब्बल 39 किलोमीटरचा रस्ता बनवण्याचा विश्वविक्रम नुकताच साताऱ्यात पार पाडला. साताऱ्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या खटाव माण भागातील पुसेगाव ते म्हासूर्णे असा हा रस्ता बनवण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राजपथ इन्फ्राकॉनने हा विश्वविक्रम केला आहे. याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. महारष्ट्राच्या एकसष्टीनिमित्त हा विश्वविक्रम केल्याचे सांगण्यात आले. काल सकाळी सात वाजता सुरु कण्यात आलेले काम आज सकाळी सात वाजता संपण्यात आले. साडेतीन मीटर रुंद आणि 39.69 किलोमीटरचा झालेला हा रस्ता पुसेगाव, जायगाव, औंध, गोपूज, म्हासूर्णे असा होता. या कामाला जवळपास 474 कामगार काम करत होते. तर 250 वाहने आणि मशिनचा वापर करण्यात आला. या कामावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, मुख्य अभियंता एस पी दराडे यांनी या कामाचे कौतुक केले.