Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 5 PM : 24 डिसेंबर 2024 : ABP Majha
लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिनाअखेर मिळणार, हा हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू, पहिल्या टप्प्यात १२ लाखाहून अधिक महिला लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्य़ास सुरुवात.
पहिल्या टप्प्यात २ कोटी ३५ लाख लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार, तर दुसऱ्या टप्प्यात आचारसंहितेमुळे छाननी रखडलेल्या 35 लाख महिलांचा निर्णय होणार.
लाडक्या बहिणींना दिड हजारचा हफ्ता आजपासून मिळणार असला तरी प्रतीक्षा २१०० रूपयांची, वाढत्या रकमेसाठी आर्थिक तरतूद कधी होणार याची उत्सुकता
लाडकी बहीण योजनेच्या नव्या नोंदणी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेली नाही, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंची एबीपी माझाला प्रतिक्रिया.
बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यायचं, यासंदर्भात अजित पवार, एकनाथ शिंदेसोबत बसून ठरवू. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नसल्याचंही केलं स्पष्ट.
सोमनाथ सूर्यवंशी दलित होता म्हणून त्याची हत्या झाली, हा राहुल गांधींनी काढलेला निष्कर्ष पुर्णपणे चुकीचा, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची राहुल गांधींवर टीका.
अमित शाह यांचा अर्धवट व्हिडिओ पोस्ट करून संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवल्या प्रकरणी काँग्रेसनं अगोदर माफी मागावी. काँग्रेसच्या आंदोलनावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
महाराष्ट्र देशातील कुठल्याही राज्यापेक्षा सुरक्षित राज्य आहे. कुठलीही घटना घडल्यानंतर असं राजकारण करणं शोभत नाही, जाती-जातीत विद्वेष निर्माण करायचाय, सुप्रिया सुळेंच्या महाराष्ट्र सुरक्षित नसल्याच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल, सुरेश धस यांची माहिती, हत्येचा वाल्मिक कराड प्रमुख सूत्रधार, सुरेश धस यांचा आरोप..