पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
कुणालच्या ऐवजी सामान्य व्यक्ती असला असता तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असता. पोलीस या सगळ्यावर गप्प का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना धाकात ठेवण्याचा प्रकार समोर आला आहे. व्हीआयपी गाडीतून सायरन वाजवत जाणाऱ्या एका चालकाने वाहतूक पोलिसांशी अरेरावीने वागून, त्यांना धमकावण्याचा प्रकार केला. या प्रकरणातील आरोपीचे नाव कुणाल बाकलिवाल असून, तो व्यवसायाने बिल्डर आणि लँड डेव्हलपर आहे. तसेच राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा आहे. पोलिसांना कस्पटासमान लेखत शिवीगाळ करणाऱ्या माजोरड्या गाडीचालकाची सध्या एकच चर्चा आहे. साहेबांना बोला असं म्हणत पोलिसांकडे फोन देत मला ओळखत नाही का? तुम्हाला सगळ्यांना दोन तासांत ‘सस्पेंड’ करतो अशा मुजोरीत पोलिसांना धमकी देणाऱ्या, आरेरावी करत हुज्जत घारणाऱ्या कुणाल बाकलिवालचं पोलिसांनी सगळं ऐकून कसं घेतलं? पोलीस गप्प का? हा प्रश्न आहे. दरम्यान कुणाल बाकलीवाल हा बिल्डर आणि लँड डेव्हलपर असून, डिफेंडर गाडी वापरतो. अनेक राजकीय नेत्यांशी त्याचा जवळचा संबंध असल्याचंही समोर आलंय. (Crime News)
कुणालच्या ऐवजी सामान्य व्यक्ती असला असता तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असता. राजकीय नेत्यांच्या जवळचा संबंध असणाऱ्या कुणाल बाकलीवालने साहेबांना बोला म्हणत पोलिसांनकडे कुणालने फोन सरकवल्यानंतर कोणत्या साहेबांच्या सांगण्याने पोलीस गप्प झाले हा खरा प्रश्न आहे. (Chhatrapati Sambhajinagar)
नेमकं घडलं काय?
काळ्या आलिशान डिफेंडर गाडीतून जाणाऱ्या कुणाल बाकलिवालला वाहतूक पोलिसांनी गाडीतून उतरून नियमांचे पालन करण्यास सांगितले. यावर त्याने हिंदीतून "बुढ्ढे, तेरेको ड्युटी करनी आती क्या?" असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार देत त्याने, "साहेबांना बोल, मला ओळखत नाही का? दोन तासांत तुम्हाला सस्पेंड करतो," अशी धमकी दिली. गाडीतूनच माजोरड्या बाकलिवालने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितले. याच वेळी पोलिसांनी हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला. मात्र, हे लक्षात येऊनही त्याचा माज कमी झाला नाही. "जनतेच्या पैशातून पगार मिळतो, पण तुम्ही जनतेलाच वागवता का?" असे सांगत त्याने एका मोठ्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला.
पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह
बाकलिवालचा माज पाहून पोलिसांनी त्याला गाडीतून खाली उतरवले आणि थेट क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, हा प्रकार पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कारण साध्या नागरिकांनी असाच प्रकार केला असता, तर शासकीय कामात अडथळ्याचा गंभीर गुन्हा दाखल झाला असता.छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांची कमतरता नाही. सिग्नल तोडणे, सायरन वाजवत गाड्या पळवणे हे प्रकार सर्रास पाहायला मिळतात. मात्र, पोलिसांना कचरा लेखून, मोठ्या माजात धमकावणे ही गंभीर बाब आहे. बाकलिवालच्या या प्रकाराचा व्हिडिओ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.राजकीय ओळख आणि पैशाच्या माजावर पोलिसांना गृहित धरणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.
हेही वाचा:
'पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात! 'छत्रपती संभाजीनगरमध्ये अलिशान गाडीतील धनाढ्याची मुजोरी