TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 25 December 2025 : ABP Majha
स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत प्रलंबित याचिकांवर जानेवारी महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी, त्यानंतर निवडणूक आयोग निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार, फडणवीसांची पत्रकार परिषदेत माहिती.
राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अनेक सार्वजनिक योजनांवरती टाच येणार, आवश्यकता असेल तरच योजनांवरती खर्च करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना सूचना
मंत्रालयातील दालनांच्या डागडुजीला सुरुवात, राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना दालनांच्या डागडुजीवर खर्चांचा भडीमार.
सत्ता माझ्या डोक्यात जात नाही, सत्ता हे सेवेचं माध्यम, त्यामुळे पुढे ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य.
गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वतःकडे ठेवण्याची मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केली इच्छा. यापूर्वी अडीच वर्ष गडचिरोलीचं पालकमंत्रिपद फडणविसांकडेच होतं.
बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, बीड, परभणीत घडलेली घटना अत्यंत गंभीर, मुख्यमंत्री फडणवीसांची बीड, परभणी प्रकरणावर प्रतिक्रिया
बीड जिल्ह्यात विरोधी पक्ष नेत्यांनी जाण्यात काहीही अर्थ नाही, बीड जिल्ह्याचे पर्यटन करु नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवहन.
सायबर फ्रॉड सरकारसमोरील मोठं आव्हान , फडणवीसांची माध्यमांसमोर कबुली, तर खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारेही सायबर फ्रॉडला तेवढेच जबाबदार असून यावर सरकार काम करत असल्याची प्रतिक्रिया.