एक्स्प्लोर

Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत

Sheikh Hasina : जोपर्यंत 'आवश्यक सुधारणा' होत नाहीत आणि हसिना सरकारच्या चुका सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत देशात निवडणुका होणार नाहीत, असेही महफूज आलम म्हणाला.

Sheikh Hasina : ज्या पद्धतीने पाकिस्तानात इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षावर राजकीय साठमारीमध्ये बंदी आणली गेली, अगदी त्याच पद्धतीने माजी पीएम आणि भारतात राजकीय आश्रयास असलेल्या शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या अवामी लीग पक्षावर बांगलादेशातील आगामी निवडणुकीत भाग घेण्यास बंदी घातली जाऊ शकते. अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे सल्लागार महफूज आलमने एका निवडणूक रॅलीत हा दावा केला.

केवळ बांगलादेश समर्थक पक्षांनाच निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाईल

महफूज आलम म्हणाला की, केवळ बांगलादेश समर्थक पक्षांनाच निवडणूक लढवण्याची परवानगी दिली जाईल. खालिदा झिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी), जमात-ए-इस्लामी आणि विद्यार्थी संघटना बांगलादेश यांसारखे बांगलादेश समर्थक पक्षच आपले राजकारण टिकवू शकतील, अशी स्थिती आहे. निष्पक्ष निवडणुकांद्वारे हेच पक्ष देशावर राज्य करू शकतात, असे आलम म्हणाले. त्यांनी अवामी लीग पक्षाचे वर्णन बांगलादेशविरोधी आणि फॅसिस्ट असे केले आणि या पक्षाची पुन्हा भरभराट होऊ दिली जाणार नाही, असे सांगितले.

शेख हसीनांच्या चुका सुधारल्यानंतरच निवडणुका

जोपर्यंत 'आवश्यक सुधारणा' होत नाहीत आणि हसिना सरकारच्या चुका सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत देशात निवडणुका होणार नाहीत, असेही महफूज आलम म्हणाला. दोन दिवसांपूर्वी मोहम्मद युनूस म्हणाले होते की, देशात डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होऊ शकतात. महफूज म्हणालृा, आमच्या सरकारच्या प्राधान्यांमध्ये गुन्हेगारांना न्याय मिळवून देणे, पीडितांना न्याय देणे आणि बांगलादेश समर्थक सर्व राजकीय पक्षांच्या सहभागाने निष्पक्ष निवडणुका घेणे यांचा समावेश आहे. गेल्या 16 वर्षांपासून देशात असं घडलेलं नाही.

महफूज आलम हा विद्यार्थी चळवळीचा प्रमुख  

बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर महफूज आलम यांना विशेष सहाय्यक पद मिळाले. काही काळानंतर त्यांना मंत्रिमंडळात सल्लागारपद मिळाले. गेल्या वर्षी, संयुक्त अध्यक्षीय महासभेत एका कार्यक्रमादरम्यान, मोहम्मद युनूस यांनी महफूज आलमचे कौतुक केले आणि त्यांना विद्यार्थी चळवळीचे 'मास्टर माइंड' म्हटले. युनूस म्हणाले की, महफूज आलमशिवाय शेख हसीना सरकार पाडणे कठीण होते. मोहम्मद युनूस यांनी बांगलादेशची सत्ता हाती घेतल्यापासून हसिना यांच्यावर 100 हून अधिक खटले दाखल करण्यात आले आहेत. जर अवामी लीगला निवडणूक लढवण्यापासून रोखले गेले तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, जमात-ए-इस्लामी आणि मोहम्मद युनूस समर्थित पक्षाला राजकीय धार मिळू शकते.

महफूज आलमकडून चुकीचा नकाशा पोस्ट 

दरम्यान, मंगळवारी बांगलादेशातील स्वातंत्र्याच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त, अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांचे सल्लागार महफूज आलम यांनी बांगलादेशचा चुकीचा नकाशा पोस्ट केला होता. या नकाशात महफूज आलमने भारतातील बंगाल, त्रिपुरा आणि आसामचा काही भाग बांगलादेशात दाखवला. मात्र, वाद वाढल्यानंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेतNew Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळाRepublic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
Aditi Tatkare: रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
Embed widget