Republic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025
Republic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025
कर्नाटकच्या चित्ररथात ऐतिहासिक लक्कुंडी मंदिराचं प्रदर्शन. चालुक्य वंशाच्या शिलालेखांसाठी हे मंदिर प्रसिद्ध.
कृषीप्रधान पंजाब राज्याचं यंदाच्या चित्ररथातून दर्शन. समृद्ध संगीत परंपरा आणि फुलकारी या हस्तकलेचंही प्रदर्शन.
पर्यावरणपूरक लाकडाच्या खेळण्यांवर आधारित आंध्रप्रदेशचा चित्ररथ . यामध्ये विविध नैसर्गिक रंगाचा वापर करुन चित्ररथाची सजावट,कर्तव्यपथावरील आंध्र प्रदेशच्या चित्ररथानं वेधलं साऱ्यांच लक्ष
उत्तर प्रदेश राज्यानं यंदा महाकुंभ २०२५ चा देखावा साकारला, चित्ररथातून महाकुंभच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन
समृद्ध ज्ञान आणि शांतीच्या परंपरेचं बिहारच्या चित्ररथातून दर्शन . बोधी वृक्ष, बुद्धांचं धम्मचक्र, प्राचीन नालंदा विद्यालय, भित्ती चित्रांमधून बिहारच्या संस्कृतीनं वेधलं साऱ्यांचं लक्ष
कर्तव्यपथावर झारखंडच्या चित्ररथातून रतन टाटा यांना श्रद्धांजली,चित्ररथात रतन टाटांचा पुतळा