एक्स्प्लोर

Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य

Beed Crime: मस्साजोग प्रकरणात तथ्य असल्यास धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री राजीनामा द्यायला लावतील , असे वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

सांगली: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात चौकशी सुरू आहे. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास  समर्थ आहेत. त्यांना जर वाटलं की या प्रकरणात काही तथ्य आहे, तर ते ताबडतोब धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना राजीनामा द्यायला सांगतील, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. संतोष देशमुख हत्याप्रकरणात अद्याप पोलीस यंत्रणा चौकशी करत आहेत. एसआयटी नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे. वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यासह आरोपींना मकोका लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यात पर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु आहे. वाल्मिक कराड याला देखील 302च्या गुन्ह्यात घेतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते रविवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाविषयी भाष्य केले. उपोषण करणं, धरणे आंदोलन करणं हे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ज्या वेळी मागण्या मागितले आहेत. त्या पूर्ण केल्या आहेत. १८०० विद्यार्थ्यांनी केंद्राच्या ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटवर प्रवेश घेतला आहे. केंद्रात ईडब्ल्यूएस आहे. पण महाराष्ट्रात मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये राहता येत नाही. परंतु असं असलं तरी त्या विद्यार्थ्यांना या वर्षापुर्ता केंद्राचं ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मान्य करून प्रवेश दिलं आहे. त्यामुळे आता मागणी मांडा, चर्चा करा मार्ग निघेल. मनोज जरांगे पाटील यांनी आता मुंबईत येणं सुरू केलं पाहिजे. तसेच शिष्टमंडळासह निवेदन घेऊन चर्चेला आलं पाहिजे व येताना कायदेशीर बाजू माहिती असणारीच लोक आणली पाहिजेत, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरागेंना दिला. 

पालकमंत्रीपदावरुन महायुतीत नाराजी, चंद्रकांत पाटील म्हणाले...

जिवंत माणसांनाच एखादी गोष्ट आवडते आणि नावडते. त्यामुळे जिवंत माणसांमध्ये रुसवे फुगवे असतात. कुटुंब प्रमुख रुसवे फुगवे संपवतात. तसे आमचे कुटुंब प्रमुख दाओसला गेले होते. ते आता परतले आहेत. ते रुसवे फुगवे काढतील, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. 

सांगली पोलिसांनी काही दिवसापूर्वी फार मोठा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. जे  लोक ड्रगसंबंधी माहिती देतील. त्या माहितीच्या आधारे मुद्देमाल जप्त केला गेला तर माझ्या सॅलरी अकाउंट मधून दहा हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल. ड्रग्जची कारवाई केली जातेच. नाही झाली तरी मी रस्त्यावर उतरेन, असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.

दुष्काळामुळे जत तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी पुरेसे मिळत नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेथील नागरिक कर्नाटकामध्ये जाण्यास इच्छुक होते. परंतु आता टेंभू योजनेतून जत तालुक्याला प्रत्येक कानाकोपऱ्यात तलावत पाणी पोहोचण्याचे काम जवळजवळ 60% पूर्ण झाले आहे. लवकरात लवकर ते पूर्ण होईल, त्यामुळे जत तालुक्यातील दुष्काळाचा प्रश्न मिटल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

आणखी वाचा

वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयात व्हीआयपी ट्रीटमेंट, चकाचक वॉर्डमध्ये उपचार, फक्त एकट्यासाठी 11 बेड रिकामे ठेवले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Aditi Tatkare: रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजेबाबत स्पष्ट भूमिका
रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजेबाबत स्पष्ट भूमिका
Tilak Varma : 'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलंABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Aditi Tatkare: रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजेबाबत स्पष्ट भूमिका
रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजेबाबत स्पष्ट भूमिका
Tilak Varma : 'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Embed widget