एक्स्प्लोर

पहिल्याच दिवशी Threads अ‍ॅपला युजर्सची पसंती! मस्क यांनी घेतला धसका, Meta वर कायदेशीर कारवाईची धमकी

Threads Social App : मेटा कंपनीचं नवीन अ‍ॅप Threads व्हायरल होताच ट्विटरने (Twitter) मेटा (Meta) ला कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे.

Threads New Social App of Meta : मेटा कंपनीने नुकतंच थ्रेड्स (Threads) हे नवीन सोशल मीडिया अ‍ॅप लाँच केलं आहे. पहिल्याच दिवशी कोट्यवधी युजर्सने थ्रेड्स (Threads) ला पसंती दर्शवली आहे. थ्रेड्स (Threads) अ‍ॅप ट्विटरला (Twitter) टक्कर आहे. पहिल्याच दिवशी थ्रेड्स व्हायरल होत आहे. थ्रेड्सच्या लाँचिंगमुळे ट्विटरला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ट्विटरच सीईओ एलॉन मस्क यांनी धसका घेतल्याचं दिसत आहे. आता ट्विटरने मेटाच्या थ्रेड्सवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. 

ट्विटरची थ्रेड्सला धमकी, मेटावर कारवाईचा इशारा

मेटाने 6 जुलै रोजी लाँच केलेलं थ्रेड्स अ‍ॅप एलॉन मस्क यांच्या मालकीचं मायक्रो-ब्लॉगिंग अ‍ॅप ट्विटरला टक्कर देणार आहे. एकीकडे ट्विटरकडून विविध बदल करण्यात येत असताना आता थ्रेड्स ट्विटर समोरील सर्वात मोठं आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर आता ट्विटरने मेटा कंपनीला थ्रेड्स विरोधात खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.

ट्विटरचं मेटाचे मालक झुकरबर्ग यांना पत्र

काही मीडिया रिपोर्टनुसार, आता ट्विटरने मेटाच्या नवीन थ्रेड्स प्लॅटफॉर्मवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. सेमाफोनच्या वृत्तानुसार, ट्विटरने मेटाच्या नवीन थ्रेड्स अ‍ॅपवर कायदेशीर कारवाईची धमकी दिली आहे. यासंदर्भात ट्विटरचे वकील अ‍ॅलेक्स स्पिरो यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्रही पाठवलं आहे.

कॉपीराइटवरून वाद

दरम्यान, ट्विट आणि थ्रेड्समधील वाद कॉपीराइटवरून असल्याची माहिती समोर येत आहे. थ्रेड्सचं स्वरुप (Interface) ट्विटरसारखाच असल्याचा दावा ट्विटरने केला आहे. याशिवाय ट्विटरवर थ्रेड नावाचं फीचर आहे. जेव्हा एक जास्त शब्दांचं ट्विट अनेक भागांमध्ये विभागलं जातं, तेव्हा ते थ्रेडमध्ये विभागलं जातं. यामुळे ट्विटरने थ्रेड्सवर कॉपीराइटचा दावा केला आहे. या अहवालावर मेटा कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

काय आहे थ्रेड्स?

मेटा कंपनीने थ्रेड्स हे नवीन मायक्रोब्लॉगिंग अ‍ॅप लाँच केलं आहे. इंस्टाग्रामच्या टीमनेच थ्रेड्स अ‍ॅप बनवलं आहे. थ्रेड्समध्ये रिअल टाइम फीड देखील उपलब्ध असेल. थ्रेड्सची फिचर्स आणि संवाद साधण्याची पद्धत ट्विटरप्रमाणे आहेत. थ्रेड्स भारतासह 100 देशांमध्ये लाँच करण्यात आलं आहे. तुम्ही गुगल प्ले-स्टोअरवरून थ्रेड्स अ‍ॅप डाउनलोड करु शकता. तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंटवरून थ्रेड्सवर अकाऊंट सुरु करु शकता. जर तुमच्याकडे इंस्टाग्रामवर आधीपासून ब्लू टिक असेल म्हणजेच तुमचे इंस्टाग्राम खाते आधीच व्हेरिफाईट असेल तर थ्रेड्स अकाऊंटही आपोआप व्हेरिफाईट होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget