एक्स्प्लोर

Threads इंस्टॉल आणि लॉग इन कसं कराल? मर्यादा काय? थ्रेड्स संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरं

Threads App : इंस्टाग्रामच्या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म थ्रेड्स लाँच झाल्यानंतर पहिल्या दिवशी 3 कोटीहून अधिक युजर्सनं लॉग-इन केलं आहे.

Threads Instagram’s Microblogging App : फेसबुकची (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) ची मालकी असलेल्या मेटा (Meta) कंपनीने मायक्रोब्लॉगिंग अ‍ॅप ट्विटरला टक्कर देण्यासाठी नवीन थ्रेड्स अ‍ॅप (Threads App) लाँच केलं आहे. इंस्टाग्रामच्या मायक्रोब्लॉगिंग थ्रेड्स अ‍ॅप ट्विटरप्रमाणेच आहे. त्यामुळे थ्रेड्स हा ट्विटरसाठी धोका असल्याचंही म्हटलं जात आहे. थ्रेड्स हा इंस्टाग्रामचा (Instagram) मजकूर आधारित मेसेजिंग अ‍ॅप (Text Based Messaging App) आहे. मेटाने 6 जुलैला मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अ‍ॅप लाँच केला. यानंतर 24 तासांपेक्षा कमी वेळेत थ्रेड्स अ‍ॅप 30 मिलियन म्हणजेच तीन कोटीहून अधिक युजर्सपर्यंत पोहोचलं आहे.

Threads ची Twitter ला टक्कर

सोशल मीडिया अ‍ॅप इंस्टाग्रामच्या टीमनेच थ्रेड्स विकसित केलं आहे. थ्रेड्स अ‍ॅप ट्विटरसारखंच आहेत. तुम्हाला गुगल प्ले-स्टोअरवरून थ्रेड्स अ‍ॅप डाउनलोड करता येईल. तुम्ही इंस्टाग्राम अकाऊंटचा वापर करुन थ्रेड्स अ‍ॅपवर लॉग इन करत अकाऊंट सुरु करु शकता.

Threads इंस्टॉल आणि लॉग इन कसं कराल?

तुम्ही Play Store किंवा App Store वरून थ्रेड्स अ‍ॅप मोफत डाउनलोड करू शकता. त्यानंतर अ‍ॅप इंस्टॉल करा. थ्रेड्स अ‍ॅपमध्ये तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम आयडीने लॉग इन करू शकता. तुम्ही तुमचा सर्व इंस्टाग्राम डेटा थ्रेड्स अ‍ॅपवर इंपोर्ट करू शकता. 

Threads चा वापर कसा करायचा?

तुम्ही ट्विटरप्रमाणे थ्रेड्सवर छोटे ब्लॉग पोस्ट करु शकता. याची शब्द मर्यादा ट्विटरच्या दुप्पट आहे. थ्रेड्समध्ये तुम्ही 500 शब्दांपर्यंत पोस्ट करू शकता. तर,  ट्विटरवर तुम्ही 280 शब्दांपर्यंत पोस्ट करु शकता. यामध्ये तुम्ही वेब लिंक्स, फोटो आणि एक मिनिटापर्यंतचे व्हिडीओ पोस्ट करु शकतात. तुम्ही थ्रेड्सवर 10 फोटो एकत्रित पोस्ट करु शकता. तुम्ही थ्रेड्समध्ये एखाद्याला ब्लॉक आणि फॉलो देखील करू शकता. जर तुम्ही एखाद्याला इंस्टाग्रामवर ब्लॉक केलं असेल, तर ते थ्रेड्सवरही ब्लॉक राहतील. मात्र, थ्रेड्समध्ये सध्या डायरेक्ट मेसेजिंगची सुविधा नाही.

Threads कसं काम करतं?

Apple अ‍ॅप स्टोअर आणि Google Play Store वरून तुम्ही थ्रेड्स अ‍ॅप डाउनलोड करु शकतात. तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा वापर करून तुम्ही थ्रेड्सवर लॉगिन करू शकता. यानंतर तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट थ्रेड्सचा लिंक होईल तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करत असलेली सर्व अकाऊंट्स तुम्ही फॉलो करू शकता. तुम्ही थ्रेड्सवर 500 शब्दांपर्यंत पोस्ट करू शकता. यामध्ये तुम्हाला फोटो, GIF आणि 5 मिनिटांपर्यंतचे व्हिडीओ पोस्ट करता येतील.

सध्या Threads फक्त iOS आणि अँड्रॉइड अ‍ॅप उपलब्ध आहे. कंपनीने अद्याप याचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच केलेलं नाही. थ्रेड्सवर तुम्हांला फक्त Instagram लॉगिनसह लॉग इन करता येईल. तुम्ही वापरत असलेल्या इंस्टाग्राम युजरनेमनेचं तुम्ही थ्रेड्स वापरू शकता. यामध्ये सध्या युजरनेम बदलण्याचा पर्याय देण्यात आलेला नाही.

थ्रेड्स अकाऊंट 'प्रायव्हेट' किंवा 'पब्लिक' ठेवता येईल?

तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाऊंट 'खाजगी' (Private) केलं असेल, तरीही तुम्ही तुमचे थ्रेड्स खाते 'सार्वजनिक' (Public) ठेवू शकता. पण इंस्टाग्रामप्रमाणेच थ्रेड्सवरही 16 वर्षांची वयोमर्यादा लागू आहे, त्यापेक्षा कमी वयाच्या युजर्सचं खातं 'प्रायव्हेट' राहील. तसे, कोणताही थ्रेड युजर्स त्यांचं खातं कधीही 'प्रायव्हेट' करु शकतात आणि तुमच्या पोस्टला कोण उत्तर देऊ शकेल हे निवडू शकतात.

थ्रेड्स अकाऊंट हटवता येईल का?

एकदा तुम्ही थ्रेड्सवर अकाऊंट सुरु केल्यावर तुम्हांला ते हटवता म्हणजे डिलीट करता येणार नाही. सध्या या अ‍ॅपमध्ये असा पर्याय देण्यात आलेला नाही. थ्रेड्स प्रोफाइल तयार केल्यास, तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट लिंक होतं. तुम्ही थ्रेड प्रोफाइल कधीही निष्क्रिय (Threads Profile Deactivate) करू शकता, पण तुम्ही तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्यानंतर तुमचे थ्रेड प्रोफाइल डिलीट होईल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Walmik Karad : निवडणुकीचं वऱ्हाड, आठवला कराड? Special Report
Gauri Palave Death : लेकींच्या गळ्यात फास, किती सोसायचा त्रास Special Report
KDMC Mahayuti : 'लक्षात ठेवा कमळ', केडीएमसीत स्वबळ? डोंबिवलीमध्ये नेमकं कुणाचं 'कल्याण'?
Ayodhya Ram Mandir : राम मंदिरावर फडकणार धर्मध्वजा! थेट अयोध्येतून ज्ञानदा कदम यांचा Special Report
Gen Z In Election : 'जेन झी'ची भाषा, राजकारणाची दिशा; फडणवीसांचा हुकार, GEN Z ला संधी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime Pooja Gaikwad: उपसरपंच गोविंद बर्गेंना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
उपसरपंचाला नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या नर्तिका पूजा गायकवाडला जामीन मंजूर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
कुणाला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं; मुख्यमंत्र्यांसमोरच कोल्हे-विखे सुप्त संघर्ष समोर
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू द्या, तिजोरीचा मालक आपलाच, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना इशारा
Meghana Bordikar: अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
अजित पवारांची टीका भाजप नेत्याच्या जिव्हारी, मंत्री मेघना बोर्डीकरांचं चोख प्रत्त्यत्तर; म्हणाल्या दादांनी बारामतीला कायम...
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
पुण्यात आणखी एका मार्गावर 30 किमी स्पीड बंधकारक; पोलिसांचं पत्रक जारी, कारवाई होणार
Share Market : सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना मोठा धक्का, 3 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्स 331 अंकांनी घसरला, निफ्टी 26 हजारांच्या खाली, गुंतवणूकदारांना धक्का, 3 लाख कोटी बुडाले
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
गावखेडी सोडा, आता मुंबईतही बिबट्याची दहशत; गोरेगाव पूर्व भागात रात्रीचा संचार, कॅमेऱ्यात कैद
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
संतापजनक! प्रसुत महिलेला रुग्णवाहिका चालकाने अर्ध्यावरच सोडलं; मातेची चिमुकल्यासह 2 किमी पायपीट
Embed widget