(Source: Poll of Polls)
Huawei Mate 60 series : iphone ला टक्कर देणारा फोन, तरुणांमध्ये 'या' फोनची तुफान क्रेझ, काय आहेत स्पेशल फिचर्स? किंमत किती?
Huawei ने काही काळापूर्वी चीनमध्ये Huawei mate 60 सीरिज लाँच केली होती. या अंतर्गतHuawei mate 60 आणि Huawei mate 60 Pro सह 2 स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.
Huawei Mate 60 series : अॅपलच्या आयफोनची क्रेझ (Apple iphone) काय आहे हे सांगण्याची गरज नाही. अॅपलचे आयफोन जगभरात मोठ्या (Mobile Phone) प्रमाणात खरेदी केले जातात. मात्र मध्यंतरी एका चिनी स्मार्टफोनने देशांतर्गत बाजारपेठेत चांगलीच प्रसिद्धी मिळवली (Mobile Phone In budget) असून लोक त्याची जोरदार खरेदी करत आहेत. चीनमध्ये या फोनची विक्री आयफोनपेक्षा जास्त आहे. 9 to 5 macच्या अहवालानुसार, ऑक्टोबरपासून काउंटरपॉईंटच्या सर्वेक्षणात Huaweiच्या (Huawei Mate 60 series) विक्रीत 83 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर अॅपलच्या विक्रीत केवळ 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता आयफोनपेक्षा Huawei ची क्रेझ वाढताना दिसत आहे
Huaweiने काही काळापूर्वी चीनमध्ये Huawei mate 60 सीरिज लाँच केली होती. या अंतर्गतHuawei mate 60 आणि Huawei mate 60 Pro सह 2 स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. लोक कंपनीचा mate 60 स्मार्टफोन भरपूर खरेदी करत असून त्याने आयफोनलाही मागे टाकले आहे.
Huawei Mate 60 series फोनमध्ये कोणते फिचर्स आहेत?
Huawei mate 60 pro मध्ये कंपनीने ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे ज्यात 48 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, 40 मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 48 मेगापिक्स टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. फोटोग्राफीच्या दृष्टीने हा स्मार्टफोन उत्तम आहे. फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी, 12 gm RAM रॅम आणि 512 GB इंटरनल स्टोरेज आहे. MATE 60 हार्मोनीओएस 4 वर काम करते.
आयफोनला तोड देणाऱ्या Huawei Mate 60 series ची किंमत किती?
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने Huawei mate 60 3 स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच केला आहे ज्यात 12 GB + 256 GB, 12 GB + 512 GB आणि 12 GN RAM रॅम + 1 TB चा समावेश आहे. या फोनची किंमत अनुक्रमे 65,584 रुपये, 71,542 रुपये आणि 83,468 रुपये आहे. कंपनीने 3 वर्षांनंतर भारतात पुनरागमन केले आहे. काही दिवसांपूर्वीHuaweiच्या सब-ब्रँड ऑनरने ही ऑनर 90 स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. यात 5000 एमएएच ची बॅटरी आणि 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. सध्या अनेकांसध्ये आयफोनची मोठी क्रेझ दिसते आहे. मात्र या फोनमुळे आयफोनची क्रेझ कमी होताना दिसत आहे. कमी पैशात अगदी बजेटमध्ये आयफोनला तोडीसतोड फोन मिळत असल्याने या फोनही खरेदी वाढत आहे.
इतर महत्वाची बातमी-