Apple iphone Screen : आयफोनच्या हँडसेटमधील वेळ नेहमी 9:41 का असते? जाणून घ्या इंटरेस्टिंग कनेक्शन
Apple iphone Screen : तुम्ही कधी आयफोनची वेळ चेक केली आहे का? जेव्हाही आयफोन लॉन्च केला जातो तेव्हा त्यामध्ये नेहमी 9:41 ची वेळ दाखवली जाते.
Apple iphone Screen : आपल्यापैकी अनेकजण आयफोन (iphone) वापरतो. आयफोन खरेदी करताना त्याच्या किंमतपासून ते फीचर्सपर्यंत अनेक गोष्टींकडे आपण बारकाईने लक्ष देतो. पण, तुम्ही कधी आयफोनची वेळ चेक केली आहे का? जेव्हाही आयफोन लॉन्च केला जातो तेव्हा त्यामध्ये नेहमी 9:41 ची वेळ दाखवली जाते. दरवर्षी आयफोनचे नवीन मॉडेल लॉन्च केले जातात. पण, दरवर्षी ही वेळ तीच का असते? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
आता कोणी असा विचार करत असेल की, Apple कंपनीच्या मालकासाठी हा लकी टाईम असेल किंवा काही जण म्हणतील की हा नंबर ॲपलसाठी लकी असेल. पण, तुमचे हे सगळे अंदाज चुकीचे आहेत. खरंतर, अॅपलचा या वेळेशी वेगळाच संबंध आहे. हे कनेक्शन नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.
दरवर्षी मॉडेल बदललं पण वेळ तीच राहिली
एॅपल कंपनी दरवर्षी आपलं नवीन मॉडेल आणतात पण वेळ तीच असते. यामागे खरंतर मोठं असं कारण नाही. पण, ज्याप्रमाणे ऍपलच्या प्रत्येक लेटेस्ट मॉडेलला एक खास अपडेट मिळतो त्याचप्रमाणे या वेळेमागे एक खास कारण आहे. तुम्ही जर ऍपलची अधिकृत वेबसाईट चेक केली तर आयफोनमध्ये दिसणारी ही वेळ 16 वर्षांपासून बदललेलीच नाही.
'हे' आहे खास कारण
आयफोनचे गेल्या 16 वर्षांपासून रिलीज झालेले सर्व आयफोन समान वेळ दाखवतात. ही वेळ 2007 मध्ये सुरू झाली. 2007 मध्ये पहिला आयफोन लॉन्च झाला तेव्हा स्टीव्ह जॉब्स तो फोन लॉन्च करणार होते. स्टीव्ह जॉब्स यांची अशी इच्छा होती की फोन लॉन्च करताना जी वेळ आहे, तीच वेळ आयफोनमध्ये आणि बॅकग्राउंडमध्ये चालू असलेल्या प्रेझेंटेशनमध्ये असावी. उदाहरणार्थ, जर फोन 10 :20 वाजता लॉन्च झाला असेल, तर तेथे दिसणाऱ्या प्रत्येक स्क्रीनवर तीच वेळ दाखवली जावी.
ॲपलने लॉन्च प्रेझेंटेशनमध्ये घेतलेल्या वेळेच्या आधारे फोन किती वाजता लॉन्च होईल याचा अंदाज लावला. त्यानुसार सकाळी 9.41 वाजता आयफोन लॉन्च होणार होता. पण, वेळ 9.42 वाजता होती. त्यावेळी फोन लॉन्च झाला तेव्हा घड्याळात आणि प्रत्येक स्क्रीनवर 9.42 वाजले होते. तेव्हापासून ही व्यवस्था सुरू आहे. पण, 2007 नंतर 2010 मध्ये ही वेळ बदलली आणि नियोजनानुसार 9:41 झाली, त्यानंतर ही वेळ सलग 16 वर्ष सुरू आहे.
महत्त्वाच्या बातम्या :