Smartphone : स्मार्टफोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग करायचंय? फक्त 'या' स्टेप्स फॉलो करा
Smartphone : अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंगची सुविधा उपलब्ध आहे.
Smartphone : विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार आपल्या स्मार्टफोनमध्ये सतत नवीन अपडेट्स येत असतात. यामध्ये काही फीचर्स असे असतात ज्याबद्दल आपल्याला माहीतही नसतं किंवा त्यांचा वापर आपण कमी करतो. यापैकीच एक फीचर असं आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना कल्पना आहे. ते फीचर म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग (Screen Recording) आहे. हे फीचर iPhone आणि Android अशा दोन्ही फोनमध्ये आहे.
अलिकडच्या काळात हे फीचर फार लोकप्रिय झालं आहे. विशेषत: जेव्हा तुम्हाला फोनमध्ये काही प्रक्रिया दाखवायची असते आणि ती इतर कोणाशी तरी शेअर करायची असते. यासाठी अनेकदा या स्क्रीन रेकॉर्डिंगचा वापर रील किंवा व्हिडीओसाठी केला जातो. हे फीचर आयफोन आणि अँड्रॉईड अशा दोन्ही स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. तुम्हालाही तुमच्या फोनवर स्क्रीन रेकॉर्डिंग हे फीचर ऑन करायचं असेल तर ते कसं करायचं हे जाणून घेऊयात.
Android फोनमध्ये स्क्रीन कशी रेकॉर्ड कराल?
- सर्वात आधी, फोनचे कंट्रोल सेंटर ओपन करण्यासाठी तुमच्या फोनला खाली Swipe करा.
- आता तुम्हाला काही आयकॉन दिसतील, तिथे तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगचा ऑप्शन दिसेल.
- यानंतर स्क्रीन रेकॉर्डरवर टॅप करा.
- असे केल्याने तुम्हाला तुमच्या फोनच्या डिस्प्लेवर एक कंट्रोल बार दिसेल, जो तुम्हाला रेकॉर्डिंग सुरू किंवा थांबवण्यात मदत करेल.
- यानंतर, तुमच्या आवडीनुसार "प्ले" बटणावर टॅप करा आणि तुमचे रेकॉर्डिंग होईल.
iPhone ची स्क्रीन कशी रेकॉर्ड कराल?
- अॅंड्रोईड प्रमाणेच तुम्ही आयफोनची स्क्रिन रेकॉर्ड करू शकता. तुम्हाला फक्त 'कंट्रोल सेंटर' वर खाली स्वाइप करायची आहे आणि तुम्हाला 'स्क्रीन रेकॉर्डर' दिसेल.
- तुम्हाला येथे स्क्रीन रेकॉर्डर दिसत नसल्यास, तुम्ही ते सेटिंग्जमधून देखील सुरू करू शकता.
- यासाठी तुम्हाला Settings > Control Center > Screen Recorder फॉलो करावे लागेल.
- या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही तुमच्या iPhone आणि Android डिव्हाईसवर स्क्रीन रेकॉर्डिंग सहज करू शकता.
अनेकदा आपल्या स्मार्टफोनमधील या हिडन फीचर्सबद्दल आपल्याला माहिती नसते. अशा वेळी या स्टेप्स फॉलो करून तुम्ही स्क्रिन रेकॉर्डिंग या फीचरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये एखादी माहिती शेअर करण्यापासून ते व्हिडीओ शूट करण्यापर्यंत असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :