एक्स्प्लोर
आणि जगाने मास्टर ब्लास्टरला चौथ्यांदा रडताना पाहिलं
99 च्या विश्वचषकादरम्यान सचिनचे वडील रमेश तेंडुलकरांचं निधन झालं. त्यावेळी सचिन पहिल्यांदा रडताना आपल्याला दिसला. त्यानंतर 2011 साली सत्य साईबाबांच्या निधनानंतर सचिन भावूक झाला होता.
मुंबई : आपल्या गुरुला अखेरचा निरोप देताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या अश्रूंचा बांध पुन्हा एकदा फुटला आणि जगाने सचिनला रडताना चौथ्यांदा पाहिलं.
99 च्या विश्वचषकादरम्यान सचिनचे वडील रमेश तेंडुलकरांचं निधन झालं. त्यावेळी सचिन पहिल्यांदा रडताना आपल्याला दिसला. त्यानंतर 2011 साली सत्य साईबाबांच्या निधनानंतर सचिन भावूक झाला होता. 2013 साली क्रिकेटच्या या विक्रमवीराने 22 यार्डांमधल्या त्याच्या कारकीर्दीला 24 वर्षांनी विराम दिला, त्या क्षणी त्याच्या डोळ्यातले अश्रू तरळताना आपण पाहिले.
सचिन आज पुन्हा एकदा भावूक झाला. कारण त्याच्यासारख्या हिऱ्याला पैलू पाडण्याचं काम ज्यांनी केलं ते आचरेकर सर अनंतात विलीन झाले.
सरांनी आजवर शेकडो क्रिकेटपटू घडवले. त्यांनी डझनभर कसोटीवीर भारतीय संघाला दिले. त्यांच्या हाताखाली क्रिकेटची बाराखडी गिरवलेल्या पन्नासहून अधिक खेळाडूंनी रणजीची मैदानं गाजवली. अशी देदीप्यमान कामगिरी करणारा प्रशिक्षक क्रिकेटच्या इतिहासात आजतागायत झाल्याचं ऐकिवात नाही.
आचरेकर सरांची अनेक शिष्यमंडळी आज त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. सरांचे लाडके सचिन, विनोद यांच्यासह चंद्रकांत पंडित, प्रविण आमरे आणि मुंबईतील तमाम आचरेकरप्रेमींनी सरांना आज अखेरचा निरोप दिला.
सरांनी आजवर लहानथोर शेकडो खेळाडूंचं आयुष्य घडवलं. त्यासाठी त्यांना अख्खं आयुष्य वेचावं लागलं. त्यामुळे आज अखेरच्या प्रवासाला निघताना सरांसाठी हीच बाब मोठं समाधान देणारी ठरावी... कोणत्याही सन्मान आणि पुरस्काराहूनही मोठी!
संबंधित बातम्या
आचरेकर सरांच्या निधनानंतर सचिन तेंडुलकरच्या भावना
सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन
सचिनप्रमाणे माझ्या कारकीर्दीतही आचरेकर सरांची साथ : राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
बीड
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement