एक्स्प्लोर

अखेर प्रतीक्षा संपली! भारतात होणाऱ्या विश्वचषक वेळापत्रकावरून उठणार पडदा, ICC ने सांगितली तारीख

ICC World Cup 2023 scheduled : पाकिस्तान संघाने ख्वाडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला आहे. पण आता प्रतिक्षा संपली आहे.

ICC Cricket World Cup 2023 scheduled : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला 4 महिन्यापेक्षा कमी अवधी शिल्लक राहिला आहे. पण बीसीसीआय अथवा आयसीसीने अद्याप वेळापत्रक जाहीर केलेले नाही. 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे, पण वेळापत्रकाचा पत्ता नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनलवेळी (World Test Championship final 2023) बीसीसीआयने विश्वचषकाचे वेळापत्रक आयीसीला पाठवलेय. पाकिस्तान संघाने ख्वाडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला आहे. पण आता प्रतिक्षा संपणार आहे, कारण दोन दिवसात विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. 27 जून 2023 म्हणजेच मंगळवारी आयसीसी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. मुंबईत मोठ्या कार्यक्रमाद्वारे आगामी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. तेव्हापासून विश्वचषकाला 100 दिवसाचा कालावधी शिल्लक राहणार आहे. 

पाकिस्तानने ख्वाडा घातल्यामुळे वेळापत्रकाला उशीर झाला होता. ठिकाण आणि सराव सामन्यावरुन बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाट्य सुरु होते. पाकिस्तान आणि भारत या दोन देशात असलेल्या वादाचा परिणाम वेळापत्रकावर झाला होता. भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जात नाही, त्यामुळे पाकिस्ताननेही भारतात क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. पण  आता पाकिस्तानच्या या नाट्याला आता पूर्णविराम मिळणार आहे.  

भारतात विश्वचषक खेळायला जायचे की नाही, याबाबत आमच्या सरकारकडून अद्याप परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आयसीसीला वेळापत्रकाबाबत अद्याप सहमती दर्शवलेली नाही. आमच्या सरकारने भारतात जायची परवानगी दिल्यानंतरच याबाबत आम्ही निर्णय घेऊ, असे पीसीबीचे माजी चेअरमन नजीम सेठी म्हणाले होते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पाकिस्तान आणि भारत यांच्यातील हाय होल्टेज सामना आयोजित करण्यात आला आहे, यावरच पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. अहमदाबादमध्ये पाकिस्तानला सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे अद्याप त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. अहमदाबाद येथे होणारा सामना चेन्नईला होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर ऑस्ट्रेलियाविरोधात बेंगलोर आणि अफगाणिस्तानविरोधात चेन्नईमध्ये खेळण्यासही पाकिस्तान तयार नाही. बीसीसीआयने या प्रकरणाकडे लक्ष दिले नाही आणि पाकिस्तानची विनंती फेटाळली.दरम्यान, बेंगलोरचं मैदान लहान आहे तर चेन्नईची खेळपट्टी फिरकीला पोशख आहे, त्यामुळेच कदाचीत पाकिस्तानने येथे खेळण्यास नकार दिलाय, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. 

बीसीसीआयने विश्वचषकाच्या वेळापत्रकाचा ड्राफ्ट आयसीसी आणि सहभागी होणाऱ्या देशांना पाठवालाय. त्यानुसार, 2029 चा विश्वविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. हा सामना चेपॉकवर होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे नऊ सामने वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय होल्टेज सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर आयोजित करण्यात आलाय. विश्वचषकाला 5 ऑक्टोबर 2023 पासून सुरुवात होत आहे... स्पर्धा सुरु होण्यास चार महिन्यापेक्षा कमी कालावधी बाकी आहे, त्यामुळे आयसीसी लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करु शकते. 27 जून रोजी मुंबईतील कार्यक्रमात वेळापत्रकाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission : पहिला कल 8.40 वाजता कळणार, निवडणूक अधिकाऱ्यांची माहितीMahadev Jankar On Vidhansabha Result : सत्तेत येणाऱ्या पक्षासह राहणार, जानकरांचा निर्धारSanjay Raut Vidhansabha Election : महाविकास आघाडी किमान 160 जागा जिंकेल, संजय राऊतांना विश्वासRamesh Chennithala On Exit Poll : आमचा एक्झिट पोलवर विश्वास नाही, सरकार आमचंच येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
Embed widget