ODI World Cup : पाकिस्तानला हरवत विक्रमाशी बरोबरी! पाकविरोधात भारत 'अजिंक्य', आठ वेळा नमवलं
India vs Pakistan, ODI World Cup Record : विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा आठ वेळा पराभव करत पाकिस्तानच्याच विक्रमाशी बरोबरी केली आहे.
IND vs PAK, ODI World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) मध्ये भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या मैदावर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने लाखो भारतीयांसमोर गुडघे टेकले. टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्धचा हा आठवा विजय आहे. आजपर्यंत पाकिस्तानला टीम इंडियाविरुद्ध एकही सामना जिंकता आलेला नाही. तर, भारताने विश्वचषकात पाकिस्तानविरोधात सलग आठ सामने जिंकले आहेत.
वर्ल्ड कपमध्ये भारताने पाकिस्तानला 8 वेळा हरवलं
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळवला गेला. टीम इंडियाने हा सामना सात विकेटने जिंकला. विश्वचषक स्पर्धेत भारताने सलग आठव्यांदा पाकिस्तानचा पराभव केला आहे. त्याचवेळी भारताविरुद्धच्या विश्वचषकातील पहिल्या विजयाचे पाकिस्तानचे स्वप्न पुन्हा एकदा भंगलं. विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया 8-0 ने आघाडीवर आहे.
पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी
टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानचा श्रीलंकेविरोधात आठ वेळा जिंकण्याचा विक्रम आहे. विश्वचषकात पाकिस्तानच्या नावावर श्रीलंकेला सलग आठ वेळा हरवण्याचा विक्रम आहे. टीम इंडियाने पाकिस्तानच्या या विक्रमाशई बरोबरी केली आहे.
टीम इंडियाचा पाकिस्तानविरोधात एकतर्फी विजय
पाकिस्तान संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत 191 धावांचं आव्हान दिलं. यामुळे टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध विजयासाठी 50 षटकांत फक्त 192 धावांची गरज होती. भारताने या लक्ष्याचा सहज पाठलाग केला आणि अवघ्या 30.3 षटकात 3 गडी गमावून 192 धावा केल्या. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर शुभमन गिलने भारताला दमदार सुरुवात करून दिली. गिल 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. मात्र, रोहित शर्माने 63 चेंडूत 86 धावा करत ऐतिहासिक खेळी खेळली. रोहित शर्माशिवाय श्रेयस अय्यरनेही अर्धशतक झळकावले. अय्यरने 62 चेंडूत 53 धावांची खेळी खेळली. भारतीय संघाला पुढचा सामना बांगलादेशविरुद्ध 19 ऑक्टोबरला खेळायचा आहे.
महत्वाच्या इतर बातम्या :