एक्स्प्लोर

IND vs PAK : 'किंग' कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट, मैदानावरचा खास क्षण; वसीम अक्रम मात्र भडकला

World Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला साईन केलेली जर्सी भेट दिली. मैदानातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Virat Kohli & Babar Azam : भारताने पाकिस्तानला (India vs Pakistan) हरवत विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये आणखी एका विजयाची नोंद केली. भारत भूमीत टीम इंडिया (Team India) ने पाकिस्तानचा सात विकेटने पराभव केला. भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेटमध्ये टशन असली तरी दोन्ही संघांतील खेळाडूंचे एकमेकांशी खास नातं आहे. भारतीय संघ (Indian Cricket Team) आणि पाकिस्तानी संघातील मैत्री भारत-पाकिस्तान (IND va PAK) सामन्यानंतर दिसून आली. इंडिया विरुद्ध पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यानंतर टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांच्यातील खास क्षण समोर आले आहेत. सामन्यानंतर विराट कोहलीने बाबर आझमला साईन केलेली जर्सी भेट दिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

विराट कोहलीकडून बाबर आझमला जर्सी भेट

विराट कोहली आणि बाबर आझम यांची गणना जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. क्रिकेटच्या मैदानात जरी हे दोन्ही खेळाडू एकमेकांविरोधात असले तरी, दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर आहे. बाबर आझम क्रिकेट विश्वात नाव कमावण्याआधीपासूनच विराट कोहलीला 'आदर्श' (Role Model) मानतो. बाबर आझमने अनेक वेला मुलाखतीमध्ये हे सांगितलं असून कोहलीचं कौतुकही केलं आहे. तर विराट कोहलीनं बाबर आझमचं कौतुक केलं आहे.

सामन्यानंतरचा VIDEO व्हायरल

वसीम अक्रमचा संताप अनावर

सामन्यानंतर बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री आणि आदर दाखवणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला. क्रिकेट चाहत्यांला हा क्षण आवडला असून अगदी मनात उतरला आहे, पण पाकिस्तानी दिग्गज माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम नाराज झाला आहे. विराट कोहलीने बाबर आझमला जर्सी भेट दिल्यावर वसीम अक्रम संतापला आहे.

वसीम अक्रम बाबर आझमवर भडकला

वसीम अक्रम एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमादरम्यान म्हणाला, ''बाबर आझमला  आज असं करायला नको होतं. हे चित्र पाहिल्यावर मला वाटलं की आज हा दिवस नाही. जर तुम्हाला असं करायचं असेल आणि तुमच्या काकांच्या मुलाने कोहलीची जर्सी मागितलीच होती तर, तुम्ही मॅच संपल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाऊन त्याच्याकडून ती जर्सी घ्यायला हवी होती मैदानात नाही.''

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Embed widget