एक्स्प्लोर
वर्ल्डकपच्या फायनलमध्ये 'तो' निर्णय चुकलाच, पण मला त्याची खंत नाही : अंपायर कुमार धर्मसेना
क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करुन पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं. इंग्लंडच्या विजयात अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरील ओव्हरथ्रोसह मिळालेल्या सहा धावांनी निर्णायक भूमिका बजावली. ओव्हरथ्रोसह देण्यात आलेल्या सहा धावा देणे ही चूक असल्याचे जगभरातील क्रीडातज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोलंबो : क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला पराभूत करुन पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं. इंग्लंडच्या विजयात अखेरच्या षटकाच्या चौथ्या चेंडूवरील ओव्हरथ्रोसह मिळालेल्या सहा धावांनी निर्णायक भूमिका बजावली. ओव्हरथ्रोसह देण्यात आलेल्या सहा धावा देणे ही चूक असल्याचे जगभरातील क्रीडातज्ज्ञांचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंचगिरी करणाऱ्या अनेक पंचांनीदेखील अंतिम सामन्यातील पंचांचा निर्णय चुकल्याचे म्हटले आहे.
ओव्हरथ्रोसह सहा धावा देणारे पंच कुमार धर्मसेना यांनी स्वतः ही मोठी चूक असल्याचे मान्य केले आहे. परंतु ही चूक मान्य केल्यानंतर धर्मसेना म्हणाले की, "मान्य आहे चूक झाली आहे, परंतु मला त्याचा कोणत्याही प्रकारचा पश्चाताप झालेला नाही."
धर्मसेना म्हणाले की, मी सामन्यानंतर टीव्ही रिप्ले पाहिला, त्यानंतर मला माझी चूक लक्षात आली. परंतु मैदानावर टीव्ही रिप्ले पाहता येत नाही. त्यामुळे त्यावेळी मी घेतलेला निर्णय ही मानवी चूक आहे. आयसीसीनेदेखील त्यावेळी मी दिलेल्या निर्णयाबद्दल माझी पाठराखण केली आहे.
World Cup 2019 | इंग्लंडच्या विजयानंतर आयसीसीच्या बाऊंड्री काऊंट नियमावर खेळाडूंची नाराजी
इंग्लंडच्या डावात ट्रेंट बोल्टच्या अखेरच्या षटकातील चौथा चेंडू टोलवल्यानंतर बेन स्टोक्स आणि आदिल रशिद धावत होते. बेन स्टोक्स दुसरी धाव घेत असताना मार्टिन गप्टिलने केलेल्या ओव्हरथ्रोवर, चेंडू स्टोक्सच्या बॅटवर आदळून सीमापार झाला. त्यावेळी पंच कुमार धर्मसेना यांनी इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या होत्या. यामध्ये स्टोक्स आणि आदिलने धावून काढलेल्या दोन धावा आणि ओव्हरथ्रोच्या चार धावांचा समावेश आहे.
ICC World Cup 2019 : विजयानंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडची माफी मागितली!
क्रिकेटच्या नियमानुसार त्यावेळी पंचांनी सहाऐवजी पाच धावा देणे अपेक्षित होते. कारण गप्टिलने थ्रोची कृती केली, त्यावेळी स्टोक्स आणि रशिदने पहिली धाव पूर्ण केली होती. पण त्या दोघांनी दुसऱ्या धावेसाठी एकमेकांना ओलांडलं नव्हतं. त्यामुळे पूर्ण केलेली एक धाव आणि ओव्हरथ्रोच्या चार अशा मिळून पाच धावा द्यायला हव्या होत्या. परंतु पंच कुमार धर्मसेना यांच्या चुकीमुळे इंग्लंडला एक धाव अधिक मिळाली. याचा इंग्लंडला फायदा मिळाला आणि सामना टाय होऊन सुपर ओव्हरमध्ये गेला.
World Cup 2019 | क्रिकेटचा जन्मदाता देश पहिल्यांदाच विश्वविजेता, रोमहर्षक सामन्यात इंग्लंड विजयी
काय आहे आयसीसीचा नियम?
आयसीसीच्या नियम 19.8 नुसार, जर क्षेत्ररक्षकाचा ओव्हरथ्रो किंवा आणखी कोणत्या कारणाने चेंडू सीमारेषा पार गेल्यास संघाला..
- पेनल्टीच्या धावा
- चौकाराच्या धावा
- थ्रो करेपर्यंत फलंदाजांनी पूर्ण केलेल्या धावा
सर्वाधिक चौकारांच्या आधारावर इंग्लंड विजयी
न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकात दिलेल्या 242 धावांच्या आव्हानाच पाठलाग करताना, इंग्लंडने 50 षटकात 241 धावा केल्या आणि सामना टाय झाला. यानंतर सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना इंग्लंडच्या बेन स्टोक्स आणि जोस बटलरने 15 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर 16 धावांचं लक्ष्य होतं. पण न्यूझीलंडला 15 धावाच करता आल्या आणि सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. मात्र सुपीरिअर बाऊंड्री काऊंट अर्थात सामन्याती सर्वाधिक चौकाराच्या आधारावर इंग्लंडने सामना जिंकत, विजेतेपदावर नाव कोरलं. इंग्लंडने या सामन्यात 24 तर न्यूझीलंडने 16 चौकार लगावले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement