(Source: ECI/ABP News/ABP Majha)
World Athletics Championships 2022: ट्रिपल जंपमध्ये अंतिम फेरी गाठून एल्डहोस पॉलनं रचला इतिहास!
World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंपमध्ये भारतीय खेळाडू एल्डहोस पॉलनं (Eldhose Paul) अंतिम फेरी गाठून इतिहास रचलाय.
World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंपमध्ये भारतीय खेळाडू एल्डहोस पॉलनं (Eldhose Paul) अंतिम फेरी गाठून इतिहास रचलाय. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या ट्रिपल जंपमध्ये अंतिम फेरी गाठणारा एल्डहोस पॉल पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. त्यानं पात्रता फेरीत ग्रुप अ मध्ये 16.68 मीटर जंप करत सहावं स्थान पटकावलं. तसेच अंतिम फेरी गाठणाऱ्या 12 खेळाडूंच्या यादीत तो बाराव्या स्थानावर राहिला. आता भारतासाठी पदक जिंकण्यासाठी एल्डहोस पॉल रविवारी मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार, रविवारी सकाळी 6.50 मिनिटांनी अंतिम फेरीला सुरुवात होईल.
ट्वीट-
भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा भालेफेकपटू दविंदर सिंह कांगनं सर्वात प्रथम अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर नीरज चोप्रानं घवघवीत यश मिळवलं. पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात नीजर चोप्रानं 88.39 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत धडक दिलीय. नीरज चोप्राची त्याच्या कारकिर्दीतील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. आता भारतासाठी पदक जिंकण्यासाठी नीरज चोप्रा रविवारी मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार, रविवारी सकाळी 7.05 मिनिटांनी अंतिम फेरीला सुरुवात होईल.
पदक जिंकण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज
यंदाच्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला पदक मिळवून देण्यासाठी भारतीय खेळाडू पूर्ण क्षमतेनं मैदानात उतरत आहेत. भारताचे सहा अॅथलिट्स वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत पोहचले आहेत. लांब उडीत श्रीशंकर, भालाफेकीत नीरज चोप्रा, रोहित यादव, महिला भालाफेकीमध्ये अन्नू राणी आणि स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे यांनी अंतिम फेरीत धडक दिली आहे. यामुळं या सर्व खेळाडूंच्या कामगिरीवर संपूर्ण भारताचं लक्ष लागलंय.
हे देखील वाचा-
- World Athletics Championships 2022: रोहित यादवचं नीरज चोप्राच्या पावलावर पाऊल, 80.42 मीटर भालाफेक करून अंतिम फेरी गाठली!
- CWG 2022: क्रिकेट, हॉकी, कुस्ती, बॅडमिंटनपासून तर प्रत्येक खेळापर्यंत! कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय खेळाडूंचं संपूर्ण वेळापत्रक
- Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!