(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra: नीरज चोप्रा इतिहास रचणार? पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये, पहिल्याच प्रयत्नात 88.39 मीटर थ्रो!
World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) दमदार कामगिरी करून दाखवलीय.
World Athletics Championships 2022: वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) दमदार कामगिरी करून दाखवलीय. अमेरिकेत सुरू असलेल्या या चॅम्पियनशिपच्या गट फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात त्यानं 88.39 मीटर भालाफेक करून अंतिम फेरीत धडक दिलीय. महत्वाचं म्हणजे, कोणताही खेळाडू त्याच्यापेक्षा जास्त अंतर कापू शकला नाही. पहिल्यादांच नीरज चोप्रानं वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. नीरज चोप्राची त्याच्या कारकिर्दीतील ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. आता भारतासाठी पदक जिंकण्यासाठी नीरज चोप्रा रविवारी मैदानात उतरेल. भारतीय वेळेनुसार, रविवारी सकाळी 7.05 मिनिटांनी अंतिम फेरीला सुरुवात होईल.
पहिल्याच प्रयत्नात दमदार थ्रो
वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत खेळाडूंना दोन गटात ठेवण्यात आलं होतं. या दोन्ही गटातील सर्वोत्तम 12 खेळाडूंना अंतिम फेरीत स्थान मिळणार होतं. ऑटोमेटिक क्वालीफिकेशनसाठी 83.50 मीटर स्केल निश्चित करण्यात आलं होतं. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात हा टप्पा पार करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्याला अ गटात स्थान देण्यात आलंय.
व्हिडिओ-
As the commentator predicted, "he wants one & done" #NeerajChopra does it pretty quickly & with ease before admin's laptop could wake up 🤣
— Athletics Federation of India (@afiindia) July 22, 2022
With 88.39m, Olympic Champion from 🇮🇳 #India enters his first #WorldAthleticsChamps final in some style 🫡 at #Oregon2022 pic.twitter.com/y4Ez0Mllw6
नीरज चोप्राची कामगिरी
नीरज चोप्रा सातत्यानं भारतासाठी उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे. गेल्या महिन्यात 2022 चा हंगाम सुरू करणाऱ्या नीरजनं तीन स्पर्धांमध्ये दोनदा राष्ट्रीय विक्रम मोडलाय. त्यानं फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडून हंगामाची सुरुवात केली. त्यानंतर त्यानं क्युर्टेन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलंय. तसेच स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये 89.94 मीटर भाला फेकून दुसरा क्रमांक पटकावत पुन्हा राष्ट्रीय विक्रम मोडलाय.
नीरज चोप्राचं जोरदार कमबॅक
नीरजनं 2017 मध्ये लंडन येथे खेळण्यात आलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या गट फेरीत 82.26 मीटर अंतर पार करू शकला. ज्यामुळं त्याला अंतिम फेरीत स्थान मिळालं नव्हतं. मात्र, त्यानंतर 2019 मध्ये दोहा येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये कोपराच्या शस्त्रक्रियेमुळं तो भाग घेऊ शकला नव्हता. पण त्यानंतर जोरादार कमबॅक करत अनेक विक्रम मोडले.
हे देखील वाचा-