एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अखेर धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद का केलं?
महेंद्रसिंह धोनीही तिरंगा लावून खेळत असे, पण अचानक त्याने तिरंगा लावणं बंद केलं.
मुंबई : भारतीय खेळाडू खेळासह, देशाप्रती त्यांच्या प्रेमामुळे ओळखले जातात. खेळाडू विविध पद्धतीने आपलं प्रेम दर्शवतात. क्रिकेटर्सबाबत बोलायचं झालं तर ते आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावतात.
हा ट्रेण्ड सचिन तेंडुलकरने सुरु केला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा ट्रेण्ड सुरु आहे. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, विराट कोहली हे सगळेच आपल्या हेल्मेटवर तिरंगा लावून खेळले आहेत. महेंद्रसिंह धोनीही तिरंगा लावून खेळत असे, पण अचानक त्याने तिरंगा लावणं बंद केलं.
अखेर धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद का केलं, असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित झाला आहे. हा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित झाला आणि त्याचं उत्तरही मिळालं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'कोरा'च्या माहितीनुसार, विकेटकीपिंगमुळे धोनीने हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद केलं.
खरंतर, विकेटकीपिंग करताना धोनीला सामन्यादरम्यान अधून मधून हेल्मेट घालणं आणि काढून जमिनीवर ठेवावं लागत असे. अशावेळी जर हेल्मेटवर तिरंगा असेल तर ही अपमानजनक बाब ठरेल. त्यामुळे धोनीने तिरंगा लावणंच सोडून दिलं.
जेव्हा धोनी हेल्मेटवर तिरंगा लावत असे तेव्हा सोशल मीडियावर एका व्यक्तीने याबाबत तक्रार केली होती. खेळाडू ज्या मैदानावर वारंवार थुंकतात तिथेच तिरंगा असलेलं हेल्मेट काढून ठेवतात, जे चुकीचं आहे. यानंतर धोनीने कथितरित्या हेल्मेटवर तिरंगा लावणं बंद केलं होतं. 2011 पर्यंत धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा लावलेला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement