एक्स्प्लोर
कॉमेंट्री सोडून विरु कॅमेरामन बनतो तेव्हा..

विशाखापट्टणमः टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज निवृत्तीनंतरही विविध क्षेत्रातल्या इनिंग खेळतो. त्याचाच प्रत्यय भारत विरुद्ध न्यझीलंड यांच्या विशाखापट्टणम वन डे दरम्यान आला. विरेंद्र सेहवाग कॉमेंट्री करताना आपला कॅमेऱ्याचा छंद जोपासण्यासाठी मैदानावर उतरला. आणि लाईव्ह प्रक्षेपण चालू असणाऱ्या कॅमेऱ्याची सूत्र सेहवागने हातात घेतली. सेहवागच्या या छुप्या कौशल्याबद्दल कॉमेंट्री टीमने त्याचं अभिनंदन केलं. ... आणि सेहवाग प्रेक्षकांवर भडकला. सेहवागने कॅमेऱ्याची सूत्र हातात घेतल्यानंतर आजूबाजूचे लोक त्याला सल्ला देऊ लागले. मात्र मला सगळं येतं, तुम्ही शांत बसा, असं सांगत सेहवाग सर्वांवर चांगलाच भडकला. कॉमेंट्री करताना व्हीव्हीएस लक्ष्मणने ही गोष्ट सेहवागाला विचारली. तेव्हा आपण का भडकलो याचा खुलासा विरुने केला.
आणखी वाचा























