एक्स्प्लोर
विजेंदरच्या विजयावर सेहवागचं मजेशीर ट्वीट
भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग चीनचा नंबर वन बॉक्सर झुल्पिकार मायमायतियाली धूळ चारत सलग नववा बॉक्सिंग व्यावसायिक सामना जिंकला.
मुंबई : भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग चीनचा नंबर वन बॉक्सर झुल्पिकार मायमायतियाली धूळ चारत सलग नववा बॉक्सिंग व्यावसायिक सामना जिंकला. या लढतीच्या निमित्ताने मुंबईच्या क्रीडा रसिकांना शनिवारी व्यावसायिक बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारत विरुद्ध चीन असा मुकाबला पाहायला मिळाला.
विजेंदर सिंहच्या या विजयानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने त्याच्या नेहमीच्या शैलीत खास ट्वीट केलं आहे. सामना पाहताना हक्का नुडल्सचा आनंद घेतला आणि तू चायनिज हक्का बक्का बनवलास, अभिनंदन, असं ट्वीट सेहवागने केलं.
https://twitter.com/virendersehwag/status/893879403985289216
मुंबईच्या एनएससीआयमध्ये हा सामना खेळविण्यात आला होता. ही लढत व्यावसायिक बॉक्सिंगमधल्या दोन प्रतिष्ठेच्या किताबांसाठी खेळवण्यात आली होती. बॅटलग्राऊंड एशिया असं शीर्षक या लढतीला देण्यात आलं होतं. या लढतीचा विजेता बॉक्सर विजेंदरनं आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन हे दोन्ही किताब पटाकवले आहेत.
विजेंदरसिंगची व्यावसायिक बॉक्सिंगमधली ही नववी लढत होती त्यानं याआधीच्या आठही लढती जिंकल्या होत्या. चीनच्या झुल्पिकारनं आजवरच्या नऊपैकी सहा लढतींमध्ये नॉकआऊट विजय साजरा केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement