एक्स्प्लोर
शिक्षक दिन : विराटकडून सचिन, सेहवागसह दिग्गजांचे आभार
एका वॉलवर विराटने सर्व दिग्गज खेळाडूंची नावं लिहिली आहेत, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, कपिलदेव, सौरव गांगुली यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने शिक्षक दिनी त्याच्या गुरुंचे आभार मानले आहेत. विराटने खास अंदाजात शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. एका वॉलवर विराटने सर्व दिग्गज खेळाडूंची नावं लिहिली आहेत, ज्यामध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, कपिलदेव, सौरव गांगुली यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
https://twitter.com/imVkohli/status/904975225963429892
विराटने केवळ भारताच्या माजी खेळाडूंचेच नाही, तर अनेक परदेशातील खेळाडूंचेही आभार मानले आहेत. ज्यामध्ये इंझमाम उल-हक, शॉन पोलॉक, रिकी पाँटिंग, ब्रायन लारा, सनथ जयसुर्या, शेन वॉर्न यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे.
विराट कोहलीने नुकताच वन डेत सर्वाधिक शतकवीरांच्या यादीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. तो रिकी पाँटिंगसह दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. विराटने वन डेत 30 शतकं पूर्ण केले आहेत. त्याच्या पुढे आता शतकांचा बादशाह सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर वन डेत 49 शतकं आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement