एक्स्प्लोर
वानखेडेवर पंचांची मोठी चूक, ओव्हर संपूनही तोच फलंदाज स्ट्राईकवर
मुंबई : आयपीएल दहाव्या मोसमात पंचांच्या कामगिरीवर सातत्याने बोट ठेवलं जात असताना, हैदराबाद आणि मुंबई संघांमधल्या सामन्यात पुन्हा एक मोठी चूक समोर आली आहे.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने जसप्रीत बुमराने टाकलेल्या सहाव्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकला होता. तरीही मॅकलेनहानने टाकलेल्या सातव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पुन्हा वॉर्नरनेच स्ट्राईक घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे पंच सी. के. नंदन आणि नितीन मेनन यांच्या ती बाब लक्षात आली नाही. पण टेलिव्हिजन पंच वाय. सी. यार्डे यांनीही मैदानातल्या पंचांच्या नजरेस त्यांची ही चूक आणली नाही.
मुंबई इंडियन्सच्या मागच्या सामन्यातही पंचांची हीच जोडी मैदानात होती. त्यावेळी त्यांनी मुंबईच्या दोन फलंदाजांना चुकीच्या पद्धतीने बाद दिलं होतं. त्यापैकी एक विकेट रोहित शर्माची होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement