एक्स्प्लोर
आयपीएलसाठी ट्विटरकडून खास इमोजीचं गिफ्ट
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या निमित्ताने ट्विटरातींनी इमोजीचं खास गिफ्ट मिळालं आहे. ट्विटरवर आयपीएलची चर्चा करताना, किंवा काही ट्विट करताना तुम्हाला क्रिकेटवीरांचे इमोजी किंवा स्माईलीही वापरता येणार आहेत.
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं निमित्त साधून ट्विटरने पहिल्यांदाच 30 दिग्गज क्रिकेटवीरांचे इमोजी लॉन्च केले आहेत. हॅशटॅग आणि खेळाडूचं नाव टाईप केल्यावर हे इमोजी तुमच्या ट्विटमध्ये अवतरतील.
https://twitter.com/IPL/status/849510627110506496
सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीने आयपीएलच्या दहाव्या मोसमाला हैदराबाद येथून सुरुवात झाली. सिक्सर किंग युवराज सिंहच्या धडाकेबाज खेळीने पहिला सामना अविस्मरणीय बनला.
IPL च्या उद्घाटन सोहळ्याच्या 6 रंजक गोष्टी
आयपीएलच्या दहाव्या मोसमाचं एक आगळं वैशिष्ट्य म्हणजे यंदा या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हा केवळ सलामीच्या सामन्याच्या एकाच स्टेडियममध्ये नाही तर, पाच सामन्यांच्या अलग अलग स्टेडियम्समध्ये आयोजित करण्यात आला आहे.
- हैदराबाद-बंगलोर संघांमधल्या उद्याच्या हैदराबादमधल्या सामन्याच्या दिवशी अॅमी जॅकसनची अदाकारी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.
- पुणे-मुंबई संघांमधल्या सहा एप्रिलच्या सामन्यानिमित्तानं गहुंजे स्टेडियमवर रितेश देशमुखचा परफॉर्मन्स असेल.
- सात एप्रिलला गुजरात-कोलकाता सामन्याच्या निमित्तानं टायगर श्रॉफ राजकोटच्या स्टेडियमवर परफॉर्म करेल.
- कोलकाता-पंजाब सामन्याच्या निमित्तानं 13 एप्रिलला ईडन गार्डन्सवर श्रद्धा कपूर आणि मोनाली ठाकूर या दोघींचा परफॉर्मन्स असेल.
- 15 एप्रिलला दिल्ली-पंजाब सामन्याच्या निमित्तानं दिल्लीच्या कोटला स्टेडियमवर परिणीती चोप्राचा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.
- बंगळुरू आणि इंदूरला आठ एप्रिल रोजी, तर मुंबईत नऊ एप्रिल रोजी होत असलेल्या सामन्यांआधीही एखाद्या लोकप्रिय कलाकाराचा परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळणार आहे.
हे दिग्गज खेळाडू यावर्षी आयपीएलला मुकणार!
IPL च्या उद्घाटन सोहळ्याच्या 6 रंजक गोष्टी
मायकल क्लार्क आणि पीटरसन आयपीएलमध्ये नव्या भूमिकेत
अखेर ईशांत शर्माला खरेदीदार मिळाला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement