एक्स्प्लोर
Advertisement
श्रीलंकेचं पानिपत आणि टीम इंडियाचा विक्रमांचा डोंगर!
टीम इंडियाने या संपूर्ण मालिकेत अनेक विक्रमांची नोंद केली. त्यामुळे श्रीलंका दौरा हा भारतासाठी विक्रमांचा दौरा ठरला.
कोलंबो : श्रीलंकेला 5-0 ने पाणी पाजून टीम इंडियाने परदेशातील दुसरा व्हाईटवॉश दिला. श्रीलंकेला कसोटी मालिकेनंतर वन डे मालिकाही गमवावी लागली. तर टीम इंडियाने या संपूर्ण मालिकेत अनेक विक्रमांची नोंद केली. त्यामुळे श्रीलंका दौरा हा भारतासाठी विक्रमांचा दौरा ठरला.
विराटच्या नेतृत्त्वात तीन व्हाईटवॉश
भारताने एखाद्या संघाला सहाव्यांदा व्हाईटवॉश दिला. तर श्रीलंकेला दिलेला हा दुसरा व्हाईटवॉश ठरला. भारताने यापैकी तीन वेळा विराटच्या नेतृत्त्वात, दोन वेळा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात आणि एकदा गौतम गंभीरच्या नेतृत्त्वात व्हाईटवॉश दिला आहे.
विराटच्या एका वर्षात 1000 धावा पूर्ण
विराटने या वर्षात 92.5 च्या स्ट्राईक रेटने या वर्षातील 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. एवढ्या वेगाने एका वर्षात 1000 धावा पूर्ण करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. सचिनने एका वर्षात सात वेळा एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत, तर सौरव गांगुली, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंग यांनी प्रत्येकी एका वर्षात सहा वेळा 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.
विराट सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर
सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर कायम आहे. मात्र विराट कोहलीचा शतकांचा वेग पाहता तो लवकरच सचिनलाही मागे टाकू शकतो. विराटच्या शतकांचे आकडे पाहिले, तर हे सहज शक्य दिसतं.
विराटने 186 इनिंगमध्ये 30 शतकं पूर्ण केले. सचिनला 30 शतकं पूर्ण करण्यासाठी 267 इनिंग खेळाव्या लागल्या, तर रिकी पाँटिंगला यासाठी 349 इनिंग खेळाव्या लागल्या होत्या.
विराटने 186 इनिंगमध्ये 30 शतकं पूर्ण केली. सचिनचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 16, तर पाँटिंगचे पहिल्या 186 इनिंगमध्ये 15 शतकं होते. म्हणजेच विराटने या दिग्गजांच्या दुप्पट वेगाने शतकं पूर्ण केली आहेत.
श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर व्हाईटवॉश देणारा भारत पहिलाच संघ
भारताने या विजयासोबतच विश्वविक्रमाचीही नोंद केली. वन डे क्रिकेटच्या 46 वर्षांच्या इतिहासात श्रीलंकेला त्यांच्याच देशात जाऊन 5-0 ने मात देणारा भारत पहिलाच संघ ठरला आहे.
पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत भारताने पहिला वन डे 9 विकेट्सने, दुसरा 3 विकेट्सने, तिसरा 6 विकेट्सने, चौथा 168 धावांनी आणि पाचवा वन डे 6 विकेट्सने जिंकला.
भारताने श्रीलंकेवर तीन वर्षात सलग दुसऱ्यांदा 5-0 ने मात केली. यापूर्वीही भारताने मायदेशात नोव्हेंबर 2014 मध्ये श्रीलंकेला 5-0 ने धूळ चारली होती.
दरम्यान भारताने परदेशात दुसऱ्यांदा 5-0 ने विजय मिळवला. विराट कोहलीच्या नेतृत्वातच टीम इंडियाने यापूर्वी झिम्बाम्ब्वेवर त्यांच्याच देशात 5-0 ने मात केली होती.
धोनीच्या वन डेत 100 स्टम्पिंग
टीम इंडियाचा यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने कोलंबोच्या पाचव्या वन डेत यष्टिरक्षक या नात्याने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने श्रीलंकेच्या अकिला धनंजयला यष्टिचीत करून, वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शंभर फलंदाजांना यष्टिचीत करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
याआधी हा विक्रम श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक कुमार संगकाराच्या नावावर होता. त्याने 404 सामन्यांमध्ये 99 फलंदाजांना यष्टिचीत केलं होतं. धोनीने 301व्या सामन्यात यष्टिचीतच्या बळींचं शतक आणि विश्वविक्रम साजरा केला.
जसप्रीत बुमराचा विक्रम
बुमराने पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 15 विकेट्स नावावर केल्या. यापूर्वी दोन देशांमध्ये खेळवल्या गेलेल्या 5 सामन्यांच्या वन डे मालिकेत सर्वाधिक 14 विकेट्स घेण्याच्या विक्रमाची नोंद आहे.
यापूर्वी न्यूझीलंडचा जलद गोलंदाज आंद्रे अॅडम्सने 2002-03 साली भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत 14 विकेट्स नावावर केल्या होत्या. तर 2009-10 मध्येही पाकिस्तानविरुद्धच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज क्लिंट मॅकीने 14 विकेट घेतल्या होत्या.
दोन गोलंदाजांच्या पाच विकेट्स
1999 विश्वचषकानंतर पहिल्यांदाज दोन भारतीय गोलंदाजांनी एकाच वन डे मालिकेत पाच विकेट्स पूर्ण केल्या. जसप्रीत बुमरा आणि भुवनेश्वर कुमार यांनी पाच विकेट घेतल्या. 1999 च्या विश्वचषकात रॉबिन सिंह आणि व्यंकटेश प्रसाद यांनी पाच विकेट घेतल्या होत्या.
संबंधित बातम्या :
बुमराला गाडी मिळाली, सर्वांना टपावर घेऊन धोनीने पळवली!
विराट लवकरच शतकांचा बादशाह सचिनलाही मागे टाकणार?
श्रीलंकेला त्यांच्याच मैदानावर 5-0 ने मात देणारा भारत एकमेव संघ!
सर्वाधिक वन डे शतकांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर!
क्लीन स्विप! पाचव्या वन डेत श्रीलंकेचा 6 विकेट्स राखून धुव्वा
वन डेत सर्वाधिक स्टम्पिंग धोनीच्या नावावर!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement