एक्स्प्लोर

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : न्यूझीलंडविरुद्ध फायनलमध्ये कशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11?, टीम इंडियाचा विश्वविजेता खेळाडू स्पष्ट बोलला...

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : भारताला टी-20 वर्ल्ड कप 2026 चं विजेतेपद जिंकण्यासाठी आता फक्त न्यूझीलंडचा अडथळा पार करायचा आहे.

Ind vs Nz Final T20 World Cup 2026 : भारताला टी-20 वर्ल्ड कप 2026 चं विजेतेपद जिंकण्यासाठी आता फक्त न्यूझीलंडचा अडथळा पार करायचा आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाने प्लेइंग-11 मध्ये बदल करावा का, याबाबत टीम इंडियाचा विश्वविजेता आणि माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांनी आपलं मत स्पष्टपणे मांडलं आहे.

प्लेइंग-11 मध्ये बदलाची गरज नाही...

भारत-इंग्लंड सेमीफायनल सामना संपल्यानंतर क्रिकबझवर बोलताना वीरेंद्र सेहवाग यांनी अंतिम सामन्याबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलसाठी भारताने प्लेइंग-11 मध्ये बदल करावा का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना सेहवाग म्हणाले की, त्यांच्या मते भारतीय संघाने फायनलसाठी प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल करू नये.

सेहवाग म्हणाले, “माझ्या मते फायनलमध्ये प्लेइंग-11 मध्ये बदल करण्याची गरज नाही. मात्र संघ जेव्हा अहमदाबादमध्ये पिच पाहील, ती लाल मातीची आहे की काळ्या मातीची, परिस्थिती कशी आहे आणि न्यूझीलंडची ताकद काय आहे. याचा अभ्यास केल्यानंतर एखादा टॅक्टिकल बदल केला जाऊ शकतो. पण एकूण पाहता भारतीय संघात मोठे बदल करण्याची गरज मला वाटत नाही.”

वरुण चक्रवर्तीला दिला पाठिंबा

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने चार षटकांत 64 धावा दिल्या आणि जोस बटलर याचा एक महत्त्वाचा बळी घेतला. त्यावर बोलताना सेहवाग म्हणाले की, त्याची चांगलीच धुलाई झाली हे खरं, पण ती कोणत्या परिस्थितीत झाली हेही पाहणं गरजेचं आहे.

त्यांनी सांगितलं की कोलकाता असो किंवा मुंबई दोन्हीकडे फलंदाजांसाठी अतिशय अनुकूल खेळपट्ट्या होत्या. अशा परिस्थितीत किमान त्याने एक तरी फलंदाज बाद केला, हे महत्त्वाचं आहे. काही गोलंदाज तर धावा देऊनही एकही विकेट घेत नाहीत.

सेहवाग पुढे म्हणाले की, विकेट कितीही फलंदाजांसाठी अनुकूल असली तरी गोलंदाजांनी स्वतःला सावरायला शिकलं पाहिजे. “चार षटकांत साधारण 40 ते 45 धावा देऊन बाहेर पडणं योग्य ठरतं. पण इंग्लंडविरुद्ध वरुणने 15-20 धावा जास्त दिल्या,” असंही त्यांनी नमूद केलं.

टी-20 विश्वचषक 2026 साठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, ईशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.

हे ही वाचा -

Ind vs Nz Final T20 World Cup : टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा दिवस तोच गाजवणार....;  संजूचा 'त्या' फ्लॉप खेळाडूवर अजब भरोसा; न्यूझीलंडविरुद्ध येणार वादळ?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Points Table: मुंबई इंडियन्सचा एका विजयाने सगळं चित्र बदललं; आयपीएलच्या Points Table मध्ये उलथापालथ
मुंबई इंडियन्सचा एका विजयाने सगळं चित्र बदललं; आयपीएलच्या Points Table मध्ये उलथापालथ
GT Vs MI IPL 2026 : शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
शेवटी मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या 'पलटण'ला तिलक वर्माने दिले बळ; बालेकिल्ल्यात गुजरातचा धुव्वा
GT vs MI Score IPL 2026 : सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!
सलग 4 पराभवानंतर मुंबईचा धमाका; गुजरात टायटन्सचा 99 धावांनी धुव्वा!
Dasun Shanaka Banned PSL : पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
पाकिस्तानची दादागिरी की जळफळाट? श्रीलंकेच्या कॅप्टनवर घातली बंदी; क्रिकेटविश्वात खळबळ, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
Bollywood Actress Struggle Life: कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आता लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आज लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
Embed widget