एक्स्प्लोर
प्रार्थनासोबत माझी जोडी नक्की जमेल, सानियाला विश्वास
मुंबईः रिओ ऑलिम्पीकमध्ये प्रार्थना ठोंबरेशी आपली जोडी नक्की जमेल, प्रार्थना एक तरुण खेळाडू आहे. तिच्या उत्साहाचा फायदा होईल, अशी प्रतिक्रिया टेनिस स्टार सानिया मिर्झाने प्रार्थना ठोंबरे बद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिली आहे.
सानिया मिर्झाच्या आत्मचरित्राचं काल मुंबईत बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी सानियाला प्रार्थना विषयी प्रश्न विचारण्यात आला. बार्शीची प्रार्थना ठोंबरे रिओ ऑलिम्पीकमध्ये सानियाच्या जोडीने खेळणार आहे. सानिया आणि प्रार्थना यांच्या जोडीबद्दल सध्या सगळीकडे चर्चा आहे.
प्रार्थना सध्या सानिया मिर्झाच्या हैदराबादच्या अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे. रिओ ऑलिम्पीकमध्ये सानियाला दुहेरीमध्ये प्रार्थनाची साथ मिळणार आहे. प्रार्थना एक चांगली खेळाडू आहे. तिच्या यंग टॅलेंटचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया सानियाने दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement