एक्स्प्लोर

शशांक मनोहर यांचा आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुंबई : शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं शशांक मनोहर यांनी सांगितलं. आयसीसीच्या प्रशासकीय ढाचात बदल झाल्यानंतर, आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून निवडून आलेले शशांक मनोहर हे पहिलेच पदाधिकारी होते. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत ही दोन वर्षांची होती. पण मनोहर यांनी केवळ दहा महिन्यांमध्येच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मनोहर यांनी आपला राजीनामा ई-मेलने आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठवला आहे. पण या निर्णयामागे कोणतं एखादं विशिष्ट कारण आहे का, हे आपल्या राजीनामापत्रात त्यांनी नमूद केलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. ...म्हणून मनोहरांनी राजीनामा दिला! शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यापासून, बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अँड क्रिकेट बोर्ड यांची आयसीसीतली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नेटाने लढा दिला. बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ईसीबी यांना आयसीसीच्या नफ्यात अधिक वाटा देणारा ठराव 2014 सालापासून चर्चेला होता. आयसीसी संलग्न तीन बड्या असोसिएशन्सचा तो प्रयत्न मोडून काढण्यासाठी मनोहर यांनी कंबर कसली होती. यासंदर्भात आयसीसीच्या एप्रिलमधल्या बैठकीत घटनात्मक आणि आर्थिक सुधारणांचा विचार होण्याची चिन्हं होती. त्यासाठी किमान दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. पण बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वेला आपल्या बाजूने वळवून मनोहरांचा प्रयत्न हाणून पाडण्याची तयारी केली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आपला स्वाभिमानी बाणा जपला असल्याचं बोललं जात आहे. संबंधित बातम्या शशांक मनोहर आयसीसीचे नवे चेअरमन! BCCI अध्यक्षपदाच्या राजीनाम्यास भाग पाडलं : शशांक मनोहर शशांक मनोहर यांचा राजीनामा, शरद पवार BCCI चे नवे अध्यक्ष?

महत्त्वाच्या बातम्या

India Test tour of Sri Lanka : BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
BCCI ने फुंकले रणशिंग; झिम्बाब्वेनंतर टीम इंडियाचा मोर्चा थेट लंकेवर; कधी रंगणार थरार? संपूर्ण Schedule जाहीर
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
IND vs ENG 1st T20 : संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
संजू सॅमसनसह 3 स्टार्सवर टांगती तलवार, उपकर्णधाराची खुर्चीही धोक्यात
Ravi Shastri on Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO
वैभव सूर्यवंशीने आयर्लंडची पॅन्ट काढली असती; LIVE शोमध्ये रवी शास्त्री नको नको ते बोलून गेले, VIDEO

व्हिडीओ

Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी
Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
BLOG : सचिनभाऊ अभिनंदन, आतातरी बंद गिरण्या सुरू व्हाव्यात; सत्तेतूनच निघू शकतो मार्ग
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
सेल्फीच्या जमान्यात 'ऑटोग्राफ प्लीज'; अंमली पदार्थविरोधी कार्यक्रमानंतर पोलीस अधिकाऱ्याकडे धावली शाळकरी मुले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जुलै 2026 | गुरुवार 
Knight Riders Cricket Ground: शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
शाहरुख खानने थेट अमेरिकेत क्रिकेट स्टेडियम उभारलं! मैदानाची पहिली झलक देत काय म्हणाला? पुजाऱ्यांकडून विधीवत पूजा
Bus Accident: धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
धक्कादायक घटना, गुटखा थुंकायला बसमधून तोंड बाहेर काढलं; 17 वर्षीय युवकाचा हाकनाक जीव गेला
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
मोफत तिकीट देण्यावरुन बसमध्येच तुफान राडा, कंडक्टरला जबर मारहाण; एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली; महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 तासांपासून एकाच जागेवर ताटकळले
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विद्यार्थ्यांना शाळेतूनच पुस्तकांची सक्ती केली, CBSE शाळांवर कारवाई होणार; समिती नेमणार, मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
Embed widget