(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Japan Open 2022: जपान ओपन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात; उपांत्यपूर्व फेरीत एचएस प्रणॉयचा पराभव
Japan Open 2022: जपान ओपन 2022 च्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉयला (H S Prannoy) वर्ल्ड चॅम्पियनशिप ब्रॉन्झ मेडलिस्ट चीनच्या तपेईच्या चाऊ तिएन चेनकडून (Chou Tien Chen) पराभव पत्करावा लागलाय.
Japan Open 2022: जपान ओपन 2022 च्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा स्टार शटलर एचएस प्रणॉयला (H S Prannoy) वर्ल्ड चॅम्पियनशिप ब्रॉन्झ मेडलिस्ट चीनच्या तपेईच्या चाऊ तिएन चेनकडून (Chou Tien Chen) पराभव पत्करावा लागलाय. एक तास 20 मिनिटं सुरु असलेल्या अटीतटीच्या सामन्यात प्रणॉयचा 21-17, 15-21, 22-20 असा फरकानं पराभव झाला. प्रणॉयच्या पराभवासह भारताचं जपान ओपन सुपर 750 स्पर्धेतील (Super 750 tournament) आव्हानही संपुष्टात आलंय. एचएस प्रणॉयने गुरुवारी सिंगापूरच्या माजी विश्वविजेत्या लो कीन येववर दोन गेममध्ये धक्कादायक विजयाची नोंद करीत जपान ओपनच्या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
पहिल्या सेटमध्ये प्रणॉयचा पराभव
या सामन्यापूर्वी मागील दोन लढतींमध्ये चाऊवर विजय मिळवणाऱ्या प्रणॉयनं सुरुवातीच्या गेममध्ये वर्चस्व राखलं. एकावेळी तो 12-8 न आघाडीवर होता.चाऊनं मात्र प्रणॉयच्या चुकांचा फायदा घेत 15-14 अशी आघाडी घेतली. प्रणॉयनं पुन्हा चाऊच्या बॅकहँडला नेटवर खेळला. ज्यामुळं चाऊच्या खात्यात तीन पॉईंट्स जमा झाले. चाऊनं सेट क्रॉस कोर्ट रिटर्नसह हा सेट जिंकला.
दुसरा सेट जिंकत प्रणॉयचा सामन्यात कमबॅक
चाऊनं दुसऱ्या सेटमध्येही 5-4 अशी माफक आघाडी घेतली. वारंवार झालेल्या चुकांमुळं 6-10 अशा पिछाडीवर गेलेल्या प्रणॉयला त्याच्या आक्रमक वृत्तीचा फटका बसला. पण येथे प्रणॉयला त्याच्या निशिबाची साथ मिळाली आणि त्यानं 10-10 अशी बरोबरी साधली. चाऊ इंटरवलपर्यंत आघाडीवर होता. पण त्यानंतर प्रणॉयनं उत्कृष्ट खेळ दाखवत कमबॅक केलं. प्रणॉयनं झटपट 19-14 अशी आघाडी घेऊन दुसरा सेट जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये चाऊनं मारली बाजी
तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये प्रणॉयची सुरुवात खराब झाली. या सेटमध्ये चाऊनं 6-4 अशी आघाडी घेतली. इंटरवलपर्यंत चाऊनं 6 गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. पण प्रणॉयनं काही चमकदार क्रॉस कोर्ट्स चाऊला कडवी झुंज दिली. परंतु, प्रणॉयनं पुन्हा एकदा चूक केली. ज्याचा फायदा घेऊन चाऊनं 17-14 अशी आघाडी घेतली. त्यानंतर प्रणॉयनं पॉईंट वाचवले. पण त्याची सर्विस योग्य नसल्यानं चाऊला मॅच पाईंट देण्यात आला. मात्र, यावेळी मॅच पॉईंट मिळवण्यास चाऊनं कोणतीही चूक केली नाही.
हे देखील वाचा-