एक्स्प्लोर
इतर पैलवानांना सूट, राहुल आवारेला एशियाडची निवड चाचणी अनिवार्य
सुशीलकुमार, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट या चार पैलवानांना एशियाडच्या निवड चाचणीतून सूट दिली आहे. मात्र ती सूट महाराष्ट्राच्या राहुल आवारेला लागू करण्यात आलेली नाही.
मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाने सुशीलकुमार, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट या चार पैलवानांना एशियाडच्या निवड चाचणीतून सूट दिली आहे. मात्र ती सूट महाराष्ट्राच्या राहुल आवारेला लागू करण्यात आलेली नाही.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुनही राहुल आवारेला ही निवड चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे सगळ्या पैलवानांना समान न्याय का नाही, असा प्रश्न महाराष्ट्राच्या कुस्तीत विचारण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुशीलकुमार, बजरंग पुनिया, राहुल आवारे आणि विनेश फोगाट या तिन्ही पैलवानांनी सुवर्णपदकाची कमाई केली होती.
शिवाय साक्षी मलिक कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. त्यापैकी चौघांनाच भारतीय कुस्ती महासंघाने एशियाडच्या निवड चाचणीत सूट दिली आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाने राहुल आवारेवर अन्याय केल्याची भावना महाराष्ट्राच्या पैलवानांमध्ये निर्माण झाली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राहुल आवारेने 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
संबंधित बातम्या :
पैलवान राहुल आवारे डीवायएसपी होणार
लाल मातीत डोकं टेकवलं, राहुलचे वडील कृतकृत्य
'हरिश्चंद्राच्या फॅक्टरी'तला पैलवान!
मरणाची मेहनत करुन पोरगं जिंकलं, राहुलच्या यशाने वस्ताद भारावले
वायूवेगाने विजय, पैलवान सुशीलकुमारला 80 सेकंदात सुवर्ण!
वाघासारखी झुंज, चित्त्यासारखी झेप, पैलवान राहुलने राष्ट्रकुल गाजवलं!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement