एक्स्प्लोर

Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्ध अन् क्रिकेटपटूंची कोंडी; विश्वचषकातून गाशा गुंडाळला, पण घरी जाता येईना, दिल्लीमध्येच मुक्काम

Iran-Israel War Zimbabwe Return Home Delayed : मिडल ईस्टमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले केले.

Iran-Israel War Zimbabwe Return Home Delayed : मिडल ईस्टमध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी 28 फेब्रुवारी रोजी इराणवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यांत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई आणि अनेक उच्चपदस्थ सुरक्षा अधिकारी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण मिडल ईस्ट युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून इराणने प्रत्युत्तरादाखल इस्रायल आणि आखाती भागातील अमेरिकी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या संघर्षाचे पडसाद आता आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 वरही उमटू लागले आहेत, ज्याचे आयोजन भारत आणि श्रीलंका करत आहेत.

इराण-इस्रायल युद्धामुळे अडकली टीम (Iran-Israel War Zimbabwe return home delayed)

टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये झिम्बाब्वे समोर मोठे संकट उभे राहिले आहे. स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर संघ भारतातून मायदेशी परतण्याच्या तयारीत होता. मात्र मिडल ईस्टमधील हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. झिम्बाब्वेने आपला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम येथे खेळला होता, ज्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. सुपर-8 फेरीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचा स्पर्धेतील प्रवास संपला.

सध्या दिल्लीमध्येच मुक्काम

योजनेनुसार संघ सोमवारी सकाळपासून वेगवेगळ्या बॅचमध्ये दिल्लीहून हरारेकडे रवाना होणार होता. एमिरेट्सच्या उड्डाणांद्वारे दिल्ली–दुबई–हरारे असा त्यांचा प्रवास ठरला होता. काही सदस्य पहाटे 4:30 वाजता निघणार होते, तर उर्वरित सदस्य दिवसभरात प्रस्थान करणार होते. परंतु इराण-इस्रायल युद्धानंतर परिस्थिती बिघडली. दुबईसारखे महत्त्वाचे ट्रांझिट हब प्रभावित झाले असून अनेक उड्डाणे रद्द किंवा वळवण्यात आली आहेत. त्यामुळे झिम्बाब्वे संघाची परतीची योजना ठप्प झाली आहे.

सध्या संघ दिल्लीमध्येच थांबलेला आहे आणि 4 मार्चपर्यंत त्यांच्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत पर्यायी योजना तयार करण्यास सुरुवात केली आहे. ट्रॅव्हल सपोर्ट डेस्क सुरू करण्यात आला असून सुरक्षा सल्लागारांच्या मदतीने रिअल-टाइम अपडेट घेतले जात आहेत.

पाकिस्तान संघ परतला मायदेशी (Pakistan team returns home)

पाकिस्तानने शनिवारी त्यांचा शेवटचा सुपर-8 स्टेज सामना खेळला. ते विश्वचषकातून बाहेर पडले आहेत. त्यांच्या पराभवानंतर, ते श्रीलंकेच्या एअरलाइन्सच्या विमानाने कोलंबोहून लाहोरला परतले. शनिवारी सकाळी, अमेरिका आणि इस्रायलने इराणसह क्षेपणास्त्र हल्ले केले, ज्यामुळे पश्चिम आशियातील अनेक देशांचे हवाई क्षेत्र बंद झाले, ज्यामुळे या प्रदेशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हवाई प्रवास विस्कळीत झाला. यामुळे अनेक विमान कंपन्यांना उड्डाणे रद्द करावी लागली किंवा मार्ग बदलावे लागले.

हे ही वाचा -

Pakistan T20 World Cup 2026 : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, विश्वचषकातून बाहेर होताच प्रत्येक खेळाडूंकडून लाखोंची वसुली, धक्कादायक निर्णयानंतर सगळेच चक्रावले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Duleep Trophy Schedule : वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील आणखी एक मोठा टप्पा! कधी अन् किती वाजता उतरणार मैदानात?, सर्व माहिती एका क्लिकवर
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
Ind vs SL Test Series : संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही
संघात जागा मिळाली, पण प्लेइंग XI मधून OUT? आकिब नबीचं नशीब पुन्हा आडवं, 3 खतरनाक गोलंदाजांमुळे गौतम गंभीरच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये पण नाही

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Embed widget