एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटर एलन बॉर्डर यांना सेहवागचं आव्हान
नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू एलन बॉर्डर यांना त्यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या सर्व क्रिकेटपटूंनी शुभेच्छा दिल्या. मात्र, भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या हटके स्टाईलमध्ये त्यांना शुभेच्छा दितानाच, आव्हान दिले आहे.
सेहवागने ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या असून, यामध्ये, ''हॅपी बर्थडे एल बॉर्डर. लहानपणी मी एक विनोद ऐकला होता. पण बॉर्डरसाहेब आम्ही 'बॉर्डर' नावचा चित्रपटच बनवला. तुम्ही अजून गावस्कर बनवू शकला नाही.आता तेंडुलकरला तरी तयार करा.'' असे म्हटले आहे.
सेहवागच्या या विनोदी शैलीमुळे सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक प्रतिक्रीयेची वाट पाहात असतात. यापूर्वी देखील सेहवागने आपल्या हटके स्टाईलमध्ये अनेक सेलिब्रेटींना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच सेहवागने ट्विटरवरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू उमर अकमलची खिल्ली उडवली होती. त्यामुळे पाकिस्तानमधील क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती.Hpy Bdy Allan Border.Hearing joke since childhood,but Border Sahab we made film Border,you still haven't made Gavaskar,chalo make Tendulkar.
— Virender Sehwag (@virendersehwag) July 27, 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement