एक्स्प्लोर
25 वर्षीय क्रिकेटरच्या किडनी निकामी, आरपी सिंहकडून मदतीचा हात
25 वर्षीय क्रिकेटर आदित्य पाठक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. अंडर-16 पॉली उम्रीगर चषक खेळणारा आदित्य पाठकच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत.
नवी दिल्ली : 25 वर्षीय क्रिकेटर आदित्य पाठक सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. अंडर-16 पॉली उम्रीगर चषक खेळणारा आदित्य पाठकच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. त्यामुळे सध्या त्याची प्रकृती खूपच खराब आहे. अशावेळी त्याच्या मदतीसाठी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप (आरपी) सिंह पुढे आला आहे.
आदित्यच्या उपचारांसाठी त्याच्या कुटुंबानं आपलं राहतं घरही गहाण टाकलं आहे. अशावेळी क्रिकेटर आरपी सिंहनं आदित्यला मदत करावी यासाठी ट्वीटरवरुन आवाहन केलं आहे.
या ट्वीट सोबत आरपी सिंहनं एका वृत्तपत्रामध्ये आलेल्या बातमीचं कात्रणही शेअर केलं आहे. यामध्ये सर्व बँक डिटेलही देण्यात आले आहेत. तसेच आदित्यला जास्तीत जास्त मदत करण्याचं आवाहनही त्यानं केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 2009 साली आदित्यची एक किडनी निकामी झाली होती. तेव्हापासून त्याच्यावर आजपर्यंत उपाय सुरु आहेत. दरम्यान, आदित्य पाठकनं उत्तर प्रदेशच्या कानपूर क्रिकेट असोसिएशनसाठी अंपायरिंगही केलं आहे.I request you to pl donate whatever amount you can for our jr. colleague Aditya Pathak for his kidney transplant. Every little step counts. pic.twitter.com/AVFefmpYW2
— R P Singh (@RpSingh99) August 2, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement