एक्स्प्लोर
रो'हिट' मॅन...! मास्टर ब्लास्टर सचिनचा 'तो' विक्रम रोहित शर्मा मोडणार?
रोहित शर्मानं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संगकाराच्या त्या विक्रमाची बरोबरी साधली. कुमार संगकारानं 2015 सालच्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माचं हे चौथं आणि वन डे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं सव्विसावं शतक ठरलं.
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या सामन्यात ठोकलेल्या शतकानं रोहितने एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतकं करण्याच्या विक्रमाची बरोबरी केली. एकाच विश्वचषकात सर्वाधिक चार शतकं झळकावण्याचा विक्रम आजवर श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर होता. या विक्रमाशी रोहितने बरोबरी केली.
रोहित शर्मानं बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात संगकाराच्या त्या विक्रमाची बरोबरी साधली. कुमार संगकारानं 2015 सालच्या विश्वचषकात चार शतकं ठोकली होती. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माचं हे चौथं आणि वन डे आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतलं सव्विसावं शतक ठरलं.
दरम्यान आता रोहित मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मोडेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. विश्वचषकातल्या सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर विश्वचषकात सहा शतकं आहेत. टीम इंडियाचा अजून एक साखळी सामना बाकी आहे. सोबतच बांगलादेशविरुद्ध विजय मिळवत टीम इंडियाने सेमी फायनलचं तिकीट देखील फिक्स केलं आहे. त्यामुळे रोहितला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
Ind Vs Ban | भारताचा बांगलादेशवर 28 धावांनी विजय, उपान्त्य फेरीत एन्ट्री
रोहितनं दक्षिण आफ्रिकेसमोर सलामीच्या सामन्यात नाबाद 122 धावांची खेळी उभारली होती. मग ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 57 धावांची खेळी केली. पाकिस्तानसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसमोर रोहित शर्मानं 140 धावांची खेळी रचली. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या या सलामीवीरानं 102 धावांची खेळी केली. त्याच रोहित शर्मानं बांगलादेशसमोर 104 धावा फटकावून भारतीय डावाचा भक्कम पाया घातला. त्यामुळंच विश्वचषकातल्या सात सामन्यांत त्याच्या नावावर चार शतकं आणि एका अर्धशतकासह 544 धावांचा डोंगर उभा राहिला आहे. रोहितनं बांगलादेशसमोर साजरं केलेलं शतक हे विश्वचषकाच्या इतिहासातलं त्याचं पाचवं शतक ठरलं. या शतकानं त्याला रिकी पॉन्टिंग आणि कुमार संगकाराच्या पंक्तीत दाखल केलं आहे. त्या दोघांनीही विश्वचषकात पाच-पाच शतकं ठोकली आहे. विश्वचषकातल्या सर्वाधिक शतकांच्या यादीत सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. मास्टर ब्लास्टरच्या नावावर विश्वचषकात सहा शतकं आहेत. त्यामुळं रोहित शर्मा सचिनचा तो विक्रम आपल्या नावावर जमा करतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement