एक्स्प्लोर
राफेल नादालच्या 'या' विक्रमापासून अद्याप फेडरर दूरच
![राफेल नादालच्या 'या' विक्रमापासून अद्याप फेडरर दूरच Roger Federer Yet To Beat This Record By Rafael Nadal Latest Update राफेल नादालच्या 'या' विक्रमापासून अद्याप फेडरर दूरच](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/16210718/Rafael-Nadal-Roger-Federer.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : टेनिसस्टार रॉजर फेडररने आठव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद मिळवून नव्या विक्रमाची नोंद केली आहे. पीट सॅम्प्रसचा सात विम्बल्डन विजेतेपदांचा रेकॉर्ड फेडररने मोडित काढला, मात्र राफेल नादालच्या एका विक्रमापासून फेडरर अद्याप दूरच आहे.
एकाच टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक ग्रॅंडस्लॅम टायटल्स पटकवण्याचा विक्रम राफेल नादालच्या नावे जमा आहे. नादालने फ्रेन्च ओपनमध्ये सर्वाधिक म्हणजे 10 विजेतेपदं पटकावली आहेत. त्यानंतर फेडररचा दुसरा क्रमांक लागतो. फेडररने या विजयासह विम्बल्डनमध्ये आठ वेळा ट्रॉफी उंचावण्याचा मान मिळवला.
फेडररनंतर पीट सॅम्प्रसचाच क्रमांक लागतो. विम्बल्डनमधील सात विजेतेपदं त्याच्या नावावर आहेत. नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहा विजेतेपदं मिळवत चौथा क्रमांक पटकावला आहे.
https://twitter.com/mohanstatsman/status/886599910446870528
सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विक्रम मात्र फेडररच्या नावे अबाधित आहे. फेडररने आतापर्यंत 19 जेतेपदं पटकावली आहेत. 15 विजेतेपदांसह राफेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. पीट सॅम्प्रसला 14 ग्रँडस्लॅम विजेतेपदं मिळाली आहेत, तर नोवाक जोकोविचच्या नावे 12 व्हिक्टरीज आहेत.
https://twitter.com/mohanstatsman/status/886599432678002688
विम्बल्डनमध्ये पुरुष एकेरीच्या फायनलमध्ये क्रोएशियाच्या मरिन सिलिचवर मात करुन फेडररने आठव्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. 2012 नंतर पाच वर्षांनी त्याला विम्बल्डनचं जेतेपद मिळालं आहे.
फेडरर खेळत असलेली ही 29 वी ग्रँडस्लॅम फायनल आहे. विम्बल्डनची अंतिम फेरी खेळणारा फेडरर हा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. फेडरर 35 वर्षांचा आहे. यापूर्वी केन रोसवेलने 39 व्या वर्षी विम्बल्डनची फायनल खेळली होती.
संबंधित बातम्या :
फेडररने सॅम्प्रसचा रेकॉर्ड मोडला, आठव्यांदा विम्बल्डनचं जेतेपद
फेडररवर 36 लाखांची पैज लावणाऱ्या चाहत्याला 1.19 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)