एक्स्प्लोर
मेरी कोमला रिओ ऑलिम्पिकची वाईल्ड कार्ड एन्ट्री नाहीच
मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचं बॉक्सर मेरी कोमचं स्वप्न भंगलं आहे. ऑलिम्पिकसाठी मेरी कोमला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने नकार दिला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मेरी कोमला अपेक्षित कामगिरी करता आलेली नव्हती. त्यामुळे मेरी कोमची संधी नाकारल्याचं म्हटलं जात आहे. खरं तर वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशीपनंतरच मेरीच्या ऑलिम्पिक प्रवेशाच्या आशा मावळल्या होत्या. मात्र मागील ऑलिम्पिकमधली कामगिरी पाहता असोसिएशनने मेरी कोमसाठी एका समितीची स्थापना केली होती. परंतु या समितीनेही मेरीला वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यास नकार दिलाय. महत्त्वाचं म्हणजे सुपरमॉम मेरीने हार मानली नसून निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. 'मला समितीने याची कल्पना दिली होती. हा निर्णय निराशाजनक असला, तरी यावर माझं नियंत्रण नव्हतं. मी जोपर्यंत फीट आहे, असं मला वाटतं, तोपर्यंत मी खेळत राहणार' असं मेरीने ठामपणे सांगितलं आहे. 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरीने कांस्यपदकाची कमाई केली होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या आयुष्यावर आधारित, प्रियंका चोप्राची मुख्य भूमिका असलेला मेरी कोम हा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























