एक्स्प्लोर
हैदराबादची झुंज अपयशी, बंगलोरचा अवघ्या 14 धावांनी विजय
विराट कोहलीच्या बंगलोरनं सनरायझर्स हैदराबादवर अवघ्या 14 धावांनी विजय मिळवला.
बंगळुरु : विराट कोहलीच्या बंगलोरनं सनरायझर्स हैदराबादवर अवघ्या 14 धावांनी विजय मिळवला. बंगलोरने हैदराबादला वीस षटकांत २१९ धावांचं मोठं लक्ष्य समोर ठेवलं होतं. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरच्या या सामन्यात बंगलोरच्या चार फलंदाजांनी हैदराबादच्या आक्रमणावर यशस्वी हल्ला चढवला.
एबी डिव्हिलियर्सनं ३९ चेंडूंत बारा चौकार आणि एका षटकारासह ६९, मोईन अलीनं ३४ चेंडूंत दोन चौकार आणि सहा षटकारांसह ६५, कॉलिन ग्रॅण्डहोमनं १७ चेंडूंत एक चौकार आणि चार षटकारांसह ४०, तर सरफराज खाननं आठ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद २२ धावांची खेळी उभारली. त्यामुळंच बंगलोरला वीस षटकांत सहा बाद २१८ धावांची मजल मारता आली.
दरम्यान, या धावांचा पाठलाग करताना 20 षटकात हैदराबादला 204 धावांपर्यंतच मजल मारली. कर्णधार विल्यमन्सने 42 चेंडूत 81 धावा करुन हैदराबादला विजय मिळवून देण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र त्याला संघाला विजयापर्यंत पोहचवता आलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement