एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टीम इंडियाचा स्टार रवींद्र जाडेजाचा शाही विवाहसोहळा
राजकोट : टीम इंडियाचा अष्टपैलू आणि आयपीएलमधल्या गुजरात टीमचा लायन रवींद्र जाडेजा राजकोटमध्ये त्याची प्रेयसी रिवा सोळंकीशी विवाहबद्ध झाला. रवींद्र आणि रिवाच्या लग्नाचा थाट इतका मोठा होता की, एखाद्या शाही विवाहसोहळ्याला शोभाव्यात अशा परंपरा आणि विधी त्यांच्या लग्नानिमित्त दिसून आल्या.
दुपारीच रिवा वधूवेशात आपल्या कुटुंबियांसह कारमधून विवाहस्थळी दाखल झाली. तर जाडेजा घोडीवर बसून वाजत गाजत मंडपात दाखल झाला.
राजकोटमध्ये शनिवारी झालेल्या संगीत सोहळ्यात रवींद्र जाडेजाचं वेगळं रूप पाहायला मिळालं. जाडेजा अगदी सहजपणे तलवार चालवताना दिसला. राजकोटच्या रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजीही झाली आणि लग्नानिमित्त शनिवारी तर बँडवाल्यावर दौलतजादा झाल्याचंही पाहायला मिळालं.
रवींद्र जाडेजाला त्याच्या सासरच्या मंडळींकडून म्हणजे सोळंकी कुटुंबियांकडून 96 लाख रुपयांच्या ऑडीची मिळालेली भेट आपण आधीच पाहिली होती.
नवरदेव जाडेजा घोडीवर स्वार झाल्यावर वाजतगाजत वरात निघाली पण या वरातीत एका व्यक्तीनं हवेत गोळीबार केल्याचं समोर आलं. जाडेजापासून केवळ दहा फुटांच्या अंतरावार वऱ्हाडी मंडळींपैकी एकानं रिव्हॉल्वरनं जवळपास सहावेळा हवेत गोळीबार केला.
सुदैवानं या गोळीबारात कुणीही जखमी झालं नाही. पण गोळीबाराच्या आवाजानं काही काळ घोडा भेदरुन गेला होता. दरम्यान, वरातीत फायरिंगची माहिती मिळाल्यावर राजकोट पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement