एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रणजी ट्रॉफी : अक्षय वाडकरचं शतक, विदर्भाची विजयाच्या दिशेने वाटचाल
अक्षय वाडकरने प्रथम श्रेणी कारकीर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने नाबाद 133 धावांची खेळी 16 चौकार आणि एका षटकाराने सजवली.
इंदूर : अक्षय वाडकरच्या नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भाने रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात सात बाद 528 धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे विदर्भाने तिसऱ्या दिवसअखेर 233 धावांची आघाडी घेतली आहे.
विदर्भ आणि दिल्ली संघांमधला हा अंतिम सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरु आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा वाडकर 133 धावांवर, तर सिद्धेश नेरळ 56 धावांवर खेळत होता.
अक्षय वाडकरने प्रथम श्रेणी कारकीर्दीतलं पहिलं शतक साजरं केलं. त्याने नाबाद 133 धावांची खेळी 16 चौकार आणि एका षटकाराने सजवली.
यष्टीरक्षक अक्षय वाडकरने विदर्भाच्या डावात कमालीच्या सहजतेने फलंदाजी केली. वाडकरने वैयक्तिक शतक झळकावलंच, पण त्याने दोन मोठ्या भागीदारी रचून विदर्भाच्या भक्कम पायावर धावांचा कळसही चढवला.
त्याने आदित्य सरवटेच्या साथीने सातव्या विकेटसाठी 169 तर आठव्या विकेटसाठी सिद्धेश नेरळसह 113 धावांची अभेद्य भागीदारी रचली. आदित्य सरवटेने 11 चौकारांसह 79 धावांची खेळी उभारली.
विदर्भाने दिल्लीचा पहिला डाव 295 धावांवर गुंडाळला
त्याआधी ध्रुव शोरेच्या 145 धावा आणि हिंमत सिंहच्या 66 धावांच्या जोरावर रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात दिल्लीचा पहिला डाव 295 धावांवर आटोपला होता. ध्रुव शोरेने 145 धावांची खेळी 21 चौकारांनी सजवली. यंदाच्या रणजी मोसमातलं त्याचं हे पहिलंच शतक ठरलं. त्याने पाचव्या विकेटसाठी हिम्मत सिंगसोबत शतकी भागीदारीही साकारली. रजनीश गुरबानीने 6, आदित्य ठाकरेने 2 तर सिद्धेश नेरल आणि अक्षय वाखरेने प्रत्येकी एक विकेट घेतली.
रजनीश गुरबानीची हॅटट्रिक
विदर्भाचा मध्यमगती गोलंदाज रजनीश गुरबानीने दिल्लीविरुद्धच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिकची नोंद केली. रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हॅटट्रिक करणारा तो केवळ दुसरा गोलंदाज ठरला. याआधी 1973 साली रणजी करंडकाच्या फायनलमध्ये तामिळनाडूच्या बी कल्याणसुंदरमने मुंबईविरुद्ध हॅटट्रिक नोंदवली होती. रजनीशने दिल्लीच्या विकास मिश्रा, नवदीप सैनी आणि ध्रुव शोरे या फलंदाजंना माघारी धाडत हॅटट्रिक साजरी केली. विशेष म्हणजे रजनीशने आपल्या हॅटट्रिकमध्ये तिन्ही फलंदाजांना त्रिफळाचीत केलं. रजनीश गुरबानीने पहिल्या डावात हॅटट्रिकसह एकूण सहा विकेट्स घेतल्या. त्यामुळे विदर्भाने दिल्लीला 295 धावांत रोखलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement