Roger Federer Retires: रॉजर फेडररच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राफेल नदालची इमोशनल पोस्ट
Roger Federer Retires: टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररनं (Roger Federer) गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली.
Roger Federer Retires: टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररनं (Roger Federer) गुरुवारी (15 सप्टेंबर) व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली. तसेच पुढील आठवड्यात होणारी लेव्हर चषक स्पर्धा ही त्याच्या कारकीर्दीतील अखेरची असल्याचं स्पष्ट केलंय. रॉजर फेडररच्या निवृत्तीनंतर त्याच्या चाहत्यांसह अनेकजण भावूक झाले आहेत. याचदरम्यान,फेडररनं निवृत्ती जाहीर केल्यानंतर त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालही (Rafael Nadal) भावूक झालाय. नदालनं सोशल मीडियाद्वारे फेडररसाठी भावनिक पोस्ट करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
रॉजर फेडररच्या निवृत्तीनंतर राफेल नदालनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. ज्यात त्यानं असं म्हटलंय की, "प्रिय रॉजर, माझा मित्र आणि प्रतिस्पर्धी. हा दिवस कधीही येऊ नये, अशी माझी इच्छा आहे. वैयक्तिकरित्या माझ्यासाठी आणि जगभरातील क्रीडा लोकांसाठी हा एक दुःखाचा दिवस आहे. जेव्हा आपलं बोलणं झालं होतं, त्यावेळी मी हेच म्हटलं होतं. इतकी वर्ष तुझ्यासोबत घालवण्याचा आनंद आहे. कोर्टवर आणि बाहेर असे अनेक अद्भुत क्षण जगणे हा एक सन्मान आणि विशेषाधिकारही आहे. भविष्यात एकत्र येण्यासाठी आपल्याकडं आणखी बरेच क्षण असतील. अजूनही अनेक गोष्टी एकत्र करायच्या आहेत. मी तुला, तुझी पत्नी मिर्का आणि मुले आणि तुझ्या कुटुंबियांसाच्या आनंदासाठी प्रार्थना करतो. मी तुला लंडनमधील लेव्हर कपमध्ये भेटेन."
राफेल नदालच्या इन्स्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
लेव्हर कप कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा
गुडघ्यावर शस्त्रक्रिया करून फेडरर सप्टेंबरमध्ये लंडनमध्ये होणाऱ्या लेव्हर कपमध्ये परतणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये फेडरर म्हणतोय की,"टेनिसनं गेल्या काही वर्षांत मला अनेक भेटवस्तू दिल्या आहेत, या प्रवासात मला प्रेम देणारे लोक सर्वात मोठी आहेत. माझे मित्र आणि सहकारी तसेच इतर खेळाडू जे खेळासाठी सर्वकाही पणाला लावतात, त्याचे मी मनापासून आभार मानतो."
रॉजर फेडररची पोस्ट
आपल्या निवृत्तीला दुखापती, फिटनेस आणि वयाचं कारण देत रॉजर फेडरर म्हणाला की, "मी 41 वर्षांचा आहे. मी 24 वर्षात 1500 हून अधिक सामने खेळले आहेत. टेनिसनं मला खूप प्रेम आणि आदर दिलाय. पण आता माझी स्पर्धात्मक कारकीर्द संपवण्याची वेळ आलीय. लंडनमध्ये पुढील आठवड्यात लेव्हर कप ही माझी शेवटची एटीपी स्पर्धा असेल. मी निःसंशयपणे भविष्यात आणखी टेनिस खेळेन पण ते ग्रँडस्लॅम किंवा टूरवर नसेल."
हे देखील वाचा-