Roger Federer Retirement: फेडेक्स रिटायर होतोय, 'टेनिस सम्राट' रॉजर फेडररची निवृत्तीची घोषणा
Roger Federer Retirement: फेडेक्स म्हणून ओळख असणारा रोजर फेडरर यानं निवृत्तीची घोषणा केली आहे. फेडररनं आपल्या प्रदिर्घ करिअरमध्ये तब्बल 20 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम केलाय.
Roger Federer Retirement: सेरेना विलियम्सच्या निवृत्तीच्या घोषणेतून सावरणाऱ्या टेनिस चाहत्यांना आणखी धक्का बसला आहे. फेडेक्स म्हणून ओळख असणारा रॉजर फेडरर यानं निवृत्तीची घोषणा केली आहे. फेडररनं आपल्या प्रदिर्घ करिअरमध्ये तब्बल 20 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा पराक्रम केलाय.
'टेनिस सम्राट' रॉजर फेडरर यानं सोशळ मीडियावरुन निवृत्तीची घोषणा केली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेव्हर कप 2022 नंतर फेडरर टेनिस या खेळातून निवृत्ती घेणार आहे. त्यानं ट्वीट करत याबाबतचा निर्णय त्याने जाहीर केला आहे. 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर यादरम्यान लेव्हर कप स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेनंतर टेनिस कोर्टवर रॉजर फेडरर दिसणार नाही.
रॉजर फेडरर जवळपास 310 आठवडे एटीपीच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर होता. त्यानं 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा पहिला पुरूष टेनिसपटू ठरला होता. फेडररने आपल्या व्यावसायिक टेनिस कारकिर्दीत सहा ऑस्ट्रेलियन ओपन (2004, 2006, 2007, 2010, 2017, 2018), एक फ्रेंच ओपन टायटल (2009), आठ विम्बल्डन (2003, 2004, 2005, 2006, 2007, 2009, 2012, 2017) तर पाच युएस ओपन (2004, 2005, 2006, 2007, 2008) ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावली आहेत. त्याने 2018 ला आपले शेवटचे ग्रँडस्लॅम (ऑस्ट्रेलियन ओपन) जिंकले होते.
रॉजर फेडररनं आपल्या नोटमध्ये 24 वर्षाच्या प्रदिर्घ करिअरमध्ये मदत करणाऱ्या सर्वांचं आभार मानले आहेत. तसेच पत्नी मिरका हिचेही आभार व्यक्त केले आहेत.
मागील तीन वर्षांपासून मला दुखापत आणि सर्जरीमुळे अनेक आव्हानाचा सामना करावा लागला, हे सर्वांना माहित आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर कोर्टवर पुनरागमन करण्यासाठी मेहनत करावी लागली. मी सध्या 41 वर्षांचा आहे. 24 वर्षांच्या करिअरमध्ये 1500 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत. माझ्या स्वप्नापेक्षा जास्त टेनिसनं मला दिलेय. पण आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. व्यावसायिक टेनिसमधून मी निवृत्ती घेत आहे. भविष्यात टेनिस नक्कीचं खेळणार आहे. पण ग्रँड स्लॅम अथवा एटीपीमध्ये खेळणार नाही, असे फेडररनं नोटमध्ये म्हटलेय.
To my tennis family and beyond,
— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
With Love,
Roger pic.twitter.com/1UISwK1NIN
— Roger Federer (@rogerfederer) September 15, 2022
ट्विट केलेला मेसेजलाही नेटकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचं टेनिस कायम आठवणीत राहील, अशा भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी फेडररच्या खेळीचं कामगिरीची आठवण करुन दिली आहे. फेडररच्या निवृत्तीचा अनेकांना धक्का बसला आहे.
८ वेळा विम्बल्डन
— Sandeep Ramdasi (@sandeepramdasi) September 15, 2022
६ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन
५ वेळा यू एस ओपन
आणि १ फ्रेंच ओपन असे
२० ग्रँड स्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर निवृत्त #rogerfederer
Tennis Legend Roger Federer Announces Retirement@abpmajhatv https://t.co/yaKrTXI23U