Qualifier 1: मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सची दाणादाण! 57 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश
मुंबई इंडियन्सच्या या विजयात जसप्रीत बुमराहची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने त्याच्या चार षटकांत केवळ 14 धावा देऊन चार बळी घेतले.मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला.
![Qualifier 1: मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सची दाणादाण! 57 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश Qualifier 1 Mumbai Indians win the final ticket by defeating Delhi Capitals Qualifier 1: मुंबई इंडियन्सकडून दिल्ली कॅपिटल्सची दाणादाण! 57 धावांनी विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/06051440/MIDC.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MI vs DC: आयपीएल 2020 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 57 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. मुंबईच्या या विजयात जसप्रीत बुमराहची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्याने त्याच्या चार षटकांत केवळ 14 धावा देऊन चार बळी घेतले. दिल्लीकडे अद्याप अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. आता ती एलिमिनेटर सामन्यात विजयी संघासह दुसरा पात्रता सामना खेळेल.
या सामन्यात सूर्यकुमार यादव, ईशान किशन आणि हार्दिक पांड्या यांच्या शानदार फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने 20 षटकांत पाच गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल शून्यावर तीन गडी गमावणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स निर्धारित षटकात आठ गडी गमावून केवळ 143 धावा करू शकला.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीला आला. दुसर्या षटकात सलामीवीर रोहित शर्मा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. रविचंद्रन अश्विनने त्याला रोहितचा बळी ठरविला.
यानंतर क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसर्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. डिकॉक 25 चेंडूत 40 धावांवर बाद झाला. अश्विनने त्यांनाही तंबूत पाठवले. डिकॉकने आपल्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी सूर्यकमार यादव 38 चेंडूत 51 धावा काढून बाद झाला. त्याच्या अर्धशतकामध्ये त्याने सहा चौकार आणि दोन षटकार लगावले. सूर्यकुमार एनरिक नॉर्टजेच्या चेंडूवर झेलबाद झाला.
यानंतर किरन पोलार्ड शून्य आणि क्रुणाल पंड्या 10 चेंडूत 13 धावांवर बाद झाला. मुंबईची परिस्थिती 16.1 षटकांत 140 धावांवर पाच गडी अशी झाली होती. पण त्यानंतर हार्दिक पांड्याने तुफानी खेळी करत डावचं रुप पालटून टाकलं.
IPL 2020: रोहित शर्माने आपण फिट असल्याचे सांगितले, BCCI च्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित
शेवटी इशान किशन 55 आणि हार्दिक पंड्या 37 धावा करुन नाबाद परतला. पंड्याने त्याच्या खेळीत पाच षटकार लगावले. त्याचवेळी छोट्या उंचीच्या किशननेही चार चौकार व तीन षटकार लगावले. यादरम्यान किशनचा स्ट्राईक रेट 183.33 होता. हार्दिक पांड्याने 264.29 च्या स्ट्राइक रेटने धावा काढल्या.
आर अश्विनने दिल्लीच्या संघासाठी कमाल गोलंदाजी केली. त्याने आपल्या कोट्याच्या चार षटकांत केवळ 29 धावा देऊन तीन बळी घेतले. त्याचवेळी या मोसमातील सर्वात यशस्वी गोलंदाज कॅगिसो रबाडा या सामन्यात खूपच महागडा ठरला. त्याने चार षटकांत कोणतीही बळी न घेता 44 धावा केल्या.
दिल्लीने मुंबई इंडियन्सच्या 201 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग सुरु केला अन् दुसर्या षटकात दिल्लीने शून्य धावांवर त्यांचे तीन गडी गमावले. यात पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले.
सुरुवातीच्या पडझडीनंतर कर्णधार अय्यर आणि ऋषभ पंत देखील स्वस्तात माघारी परतले. अय्यर 12 आणि पंत तीन धावा काढून बाद झाले. केवळ 41 धावांत पाच विकेट पडल्यानंतर मार्कस स्टोइनिस आणि अक्षर पटेल यांनी सहाव्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. परंतु, या दोघांनाही आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणता आले नाही.
स्टायनिसने 46 चेंडूत 65 धावांचे तुफानी डाव खेळला. या दरम्यान त्याने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याचवेळी अक्षर पटेलने 33 चेंडूत 42 धावा केल्या. या खेळीत त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले.
मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने कमालीची गोलंदाजी केली. बुमराहने त्याच्या चार षटकांत केवळ 14 धावा देऊन चार गडी बाद केले. त्याच वेळी, बोल्टने दोन षटकांत एक निर्धाव षटक 9 धावा देत दोन गडी बाद केले. याशिवाय क्रुणाल पंड्या आणि किरन पोलार्डला प्रत्येकी एक यश मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)