IPL 2020: रोहित शर्माने आपण फिट असल्याचे सांगितले, BCCI च्या निर्णयावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित
रोहित शर्मा अनफिट असल्याचे कारण देऊन बीसीसीआयने त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वगळण्याचा निर्णय घेतला होता. आता रोहितने आपण फिट असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे.
दुबई:आयपीएलच्या 13 व्या हंगामात रोहित शर्माच्या दुखापतीवरुन वाद सुरु झालाय. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्मा फिट नसल्याचे सांगितले होते. परंतु आयपीएलच्या लिग राउंडच्या शेवटच्य़ा सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या विरोधात रोहित शर्मा मैदानात उतरला होता. रोहित शर्माने आपण दुखापतीतून बाहेर आल्याचे सांगितले आहे. रोहितने आपण फिट असल्याचे सांगत बीसीसीआयला धक्का दिला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित शर्माला वगळायच्या बीसीसीआयच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह उभा झाला आहे.
रोहित शर्माने मैदानात उतरल्याचा आनंद व्यक्त केला. त्याने सांगितले की, "मैदानात परत आल्यानंतर मला चांगले वाटत आहे. आणखी काही सामने खेळल्यानंतर बघूया कसे वाटते ते.''
काल झालेल्या सामन्यात रोहित शर्माने सनरायजर्स हैदराबादच्या विरोधात खेळताना सात चेंडूत चार धावा केल्या. या सामन्यात मुंबई इंडियन्सला दहा विकेटनी पराभवाला सामोरे जावे लागले. या आधीच्या चार सामन्यात रोहित शर्मा दुखापतीने खेळू शकला नव्हता.
भारतीय क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी रोहित शर्माला मैदानात परतण्याची घाई करु नये असा सल्ला दिला होता. ज्या दिवशी हा सल्ला देण्यात आला त्याच दिवशी रोहित शर्माने पुन्हा मैदानावर पाय ठेवले. 18 ऑक्टोबर रोजी झालेल्या किंग्ज इलेवन पंजाब विरुध्दच्या सामन्यात रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाली होती.
सनरायजर्स हैदराबादच्या विरोधात झालेल्या सामन्याच्या टॉसच्या दरम्यान रोहित शर्माला त्याच्या फिटनेसविषयी विचारण्यात आले. त्यावर रोहित शर्मा म्हणाला की, "असे वाटते की मी आता पूर्णपणे फिट आणि फाईन आहे."
या वर्षीच्या सुरवातीला झालेल्या न्युझीलंडविरोधात झालेल्या पाचव्या 20-20 सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली होती. त्यानंतर रोहित शर्मा वन डे आणि कसोटी मालिकेला मुकला होता.
महत्वाच्या बातम्या: