एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणेरी पलटणची तयारी सुरु, प्रो कबड्डीसाठी नवा कर्णधार
पुणे: प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या हंगामासाठी 'पुणेरी पलटण'ची टीम सज्ज झाली आहे.
गेल्या हंगामाच्या तुलनेत या हंगामासाठी संघात बरेच बदल करण्यात आले आहेत. संघाचा आक्रमक खेळाडू दीपक हुडाकडे आता पुणेरी पलटणचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. तसंच काही नवीन खेळाडूंचाही संघात समावेश झाला आहे.
अक्षय जाधव, उमेश म्हात्रे, गिरीश कर्नक, गुरुनाथ मोरे या मराठी खेळाडूंचा पुणेरी पलटणमध्ये समावेश झाला आहे.
यंदा प्रो कबड्डीमध्ये नव्या 4 संघांचा समावेश झाला आहे. त्यामुळे यंदा तब्बल 27 सामने होणार आहेत. त्यासाठी खेळाडूंना फिटनेसवर अधिक लक्ष द्यावं लागणार असल्याने, पुणेरी पलटण जोमाने तयारीला लागली आहे.
पुण्यात आज पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक हुडा आणि प्रशिक्षक बी सी रमेश यांनी संघाच्या तयारीची माहिती दिली. यावेळी संघाच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement