IND W vs BAW W, CWG 2022: बार्बाडोसविरुद्ध सामन्यापूर्वी भारतासाठी आनंदाची बातमी, स्टार ऑलराऊंडरची कोरोनावर मात
IND W vs BAW W, CWG 2022: बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतानं दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला.
IND W vs BAW W, CWG 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ (Commonwealth Games 2022) स्पर्धेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारतानं (Team India) दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन येथे खेळण्यात आलेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 8 विकेट्सनं पराभव केलाय. या विजयासह भारातानं या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलंय. यातच भारतीय संघाच्या आनंदात भर घालणारी माहिती समोर आलीय. भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राकरनं (Pooja Vastrakar) कोरोनावर मात केली असून लवकरच ती संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालीय.
पूजा वस्त्राकरची कोरोनावर मात
कॉमनवेल्थ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी पूजा वस्त्राकर आणि एस मेघनाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ज्यामुळं त्यांना कॉमनवेल्थ क्रिडा स्पर्धा खेळण्यासाठी इंग्लडला रवाना होता आलं नाही. परंतु, आता त्यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती समोर आलीय. पूजा वस्त्राकर ही भारतीय महिला संघाची महत्वाची खेळाडू आहे. तिचं संघात परतण भारतासाठी मोठी गोष्ट आहे. भारतीय ऑलिम्पिक असोशिएशननं आईओच्या सुत्राच्या हवाल्यानं पीटीआयला सांगितलं की, ती आज रात्रीपर्यंत भारतीय संघात सामील होईल.
ट्वीट-
पाकिस्तानवर विजय मिळवून भारताचं स्पर्धेत कमबॅक
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात निराशाजनक पराभवानंतर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा आठ विकेट्स राखून पराभव केला. पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी स्टार परफॉर्मर्सपैकी एक म्हणजे फिरकी अष्टपैलू स्नेह राणा, जिनं महत्वाच्या आणि निर्णायक सामन्यात एकाच षटकात दोन विकेट घेतल्या. मंधानानं संघासाठी झंझावाती अर्धशतक झळकावलं.
हे देखील वाचा-