एक्स्प्लोर

CWG 2022: कॉमनवेल्थ जलतरण स्पर्धेत भारत इतिहास रचणार? श्रीहरी नटराजची 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनलमध्ये धडक

CWG 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं.

CWG 2022: बर्मिंगहॅम (Birmingham) येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या (Commonwealth Games 2022) तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केलं. भारताच्या क्रिकेट, हॉकी संघानं आपपले सामने जिंकूले. तर, भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनं (Srihari Nataraj) 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनमध्ये (50m Backstroke Final) जागा निश्चित केलीय. त्याच्याकडं 50 मीटर बॅकस्ट्रोकच्या फायनलमध्ये विजय मिळवून इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झालीय. यामुळं संपूर्ण भारतीयांच्या नजरा लक्ष श्रीहरी नटराजच्या कामगिरीवर असणार आहेत.

25.38 सेंकदाची वेळ नोंदवून फायनलमध्ये धडक
श्रीहरी नटराजने  50 मीटर बॅकस्ट्रोकच्या उपांत्य फेरीत 25.38 सेंकदाची वेळ नोंदवून फायनलमध्ये धडक दिली. यापूर्वी उपांत्यपूर्व फेरीत त्यानं  25.52 सेकंदाची वेळ नोंदवून उपांत्य फेरीत जागा निश्चित केली होती. श्रीहरी नटराज त्याच्या हीटमध्ये दुसऱ्या आणि एकूण आठव्या स्थानावर राहिला. पुरुषांच्या 50 मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत श्रीहरी नटराजची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 24.40 सेकंद आहे. त्यानं गेल्या वर्षी यूएईमध्ये या विक्रमाला गवसणी घातली होती.

क्रिकेट सामन्यात भारतानं पाकिस्तानला नमवलं
भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाच्या झुंजार अर्धशतकाच्या (42 चेंडूत 63 धावा) जोरावर भारतानं पाकिस्तानचा 9 विकेट्सनं पराभव केलाय. या पराभवसह पाकिस्तानचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून पाकिस्तानच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानच्या संघानं गुडघे टेकले. पावसामुळं या सामन्यातील दोन षटक कमी करण्यात आले. पाकिस्तानला 18 षटकात 99 धावापर्यंत मजल मारता आली. प्रत्युत्तरात भारतानं 11.4 षटकात आणि 8 विकेट्स राखून पाकिस्ताननं दिलेलं लक्ष्य पूर्ण केलं. 

भारतीय हॉकी संघाची दणक्यात सुरुवात
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं त्यांच्या गटातील पहिल्याच सामन्यात सामन्यात घानाचा 11-0 असा पराभव केलाय. या सामन्यात भारतासाठी आठ वेगवेगळ्या खेळाडूंनी गोल केले. भारतीय हॉकी संघाचा उपकर्णधार हरमनप्रीत सिंह सर्वाधिक तीन गोल केले. हा भारतीय कर्णधार मनप्रीत सिंहचा 300 वा आणि हरमनप्रीत सिंहचा 150 वा आंतरराष्ट्रीय सामना होता.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget