CWG 2022: कॉमनवेल्थ स्पर्धेतील पदकतालिकेत भारताची मोठी झेप; तिसऱ्या दिवशीही भारतीय खेळाडूंचं दमदार प्रदर्शन
Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिगहॅम (Birmingham) कॉमवेल्थ स्पर्धेचा (CWG 2022) आज चौथा दिवस असून तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर पदकतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे.
Commonwealth Games 2022 Medal Tally: बर्मिगहॅम (Birmingham) कॉमवेल्थ स्पर्धेचा (CWG 2022) आज चौथा दिवस असून तिसऱ्या दिवशीच्या खेळानंतर पदकतालिकेत मोठा बदल पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या स्टार जलतरणपटूंच्या जोरावर तिसऱ्या दिवशीही पदकतालिकेतील पहिलं स्थान कायम राखलं. दरम्यान, भारताचा वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगानं कॉमनवेल्थच्या तिसऱ्या दिवशी दमदार प्रदर्शन करत सुवर्णपदक जिंकलंय. त्यानं बर्मिंगहॅमध्ये भारताचा तिरंगा तर फडकावलाच, याशिवाय पदकतालिकेतही भारताला मोठी झेप घेण्यास मदतही केलीय. कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 च्या पदकतालिकेत कोणता संघ कितव्या क्रमांकावर आहे? हे जाणुन घेऊयात.
कॉमनवेल्थ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीही पदकतालिकेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 22 सुवर्णपदकासह एकूण 52 पदकं जिंकली आहेत. तर, 11 सुवर्णपदकासह एकूण 34 पदक जिंकणारा इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पदकतालिकेत न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या खात्यात आतापर्यंत 10 सुवर्णपदकासह एकूण 19 पदकं आहेत. याशिवाय, चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका( 4 सुवर्ण, एकूण 6 पदक), पाचव्या क्रमांकावर कॅनडा (3 सुवर्ण, एकूण 18 पदक), सहाव्या क्रमांकावर भारत (3 सुवर्ण पदक, एकूण 6 पदक), सातव्या क्रमांकावर स्कॉटलँड (2 सुवर्ण, एकूण 17 पदक), आठव्या क्रमांकावर मलेशिया (2 सुवर्ण, एकूण 4 पदक), नवव्या क्रमांकावर नायजेरिया (2 सुवर्ण, एकूण 3 पदक) आणि दहाव्या क्रमांकावर वॉल्स (1 सुवर्ण, एकूण 9 पदक).
कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 पदकतालिका-
क्रमांक | देश | सुवर्ण | रौप्य | कांस्य | एकूण |
1 | ऑस्ट्रेलिया | 22 | 13 | 17 | 52 |
2 | इंग्लंड | 11 | 16 | 07 | 34 |
3 | न्यूझीलंड | 10 | 05 | 01 | 19 |
4 | दक्षिण आफ्रिका | 04 | 1 | 1 | 06 |
5 | कॅनडा | 03 | 6 | 9 | 18 |
6 | भारत | 03 | 02 | 01 | 06 |
7 | स्कॉटलँड | 02 | 07 | 08 | 17 |
8 | मलेशिया | 02 | 01 | 01 | 04 |
9 | नायजेरिया | 02 | 00 | 01 | 03 |
10 | वॉल्स | 01 | 02 | 06 | 09 |
भारताची सहाव्या स्थानावर झेप
कॉमनवेल्थच्या दुसऱ्या दिवसाअखेर भारत 1 सुवर्ण आणि एकूण चार पदकांसह आठव्या क्रमांकावर होता. मात्र, तिसऱ्या दिवशीही वेस्टलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी दम दाखवला. तिसऱ्या दिवशीअखेर भारतानं तीन सुवर्ण आणि एकूण सहा पदकासह सहाव्या स्थानावर झेप घेतलीय.
हे देखील वाचा-
- CWG 2022 Day 4 India Schedule: कॉमनवेल्थच्या चौथ्या दिवशीही भारतीय खेळाडू दाखवणार दम, पाहा आजचं संपूर्ण वेळापत्रक
- Commonwealth Games 2022: एका मजुराच्या मुलाने जिंकले सुवर्णपदक, एकेकाळी करायचा शिवणकाम, अचिंता शेउलीचा संघर्षमय प्रवास
- IND vs GHA, Men's Hockey: भारतीय हॉकी संघाची दणक्यात सुरुवात, पहिल्याच सामन्यात घानाला 11-0 नं नमवलं