एक्स्प्लोर
पीसीबीकडून खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ बसेसची खरेदी
लाहोरः पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ बसेसची खरेदी केली आहे. आंतरराष्ट्रीय संघांना पाकिस्तानमध्ये सुरक्षेची हमी देण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचललं आहे.
श्रीलंका संघाच्या बसवर 2009 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये कोणत्याही संघाने मालिका खेळलेली नाही. त्यामुळे संघांना सुरक्षेची हमी देणं पीसीबी समोरचं मोठं आव्हान बनलं आहे.
पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनर्जन्मासाठी प्रयत्न
पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करण्यासाठी या बसेसची खरेदी करण्यात आली आहे, असं ईएसपीएनशी बोलताना पीसीबीच्या एका प्रवक्त्याने सांगितलं.
पाकिस्तान दौरा करण्यासाठी कोणताही संघ अगोदर सुरक्षेची वाचारणा करतो. त्यामुळे या बसेस सुरक्षेच्या कारणासाठी समोरच्या संघाला सुरक्षेचा विश्वास देण्यास मदत करतील, असं प्रवक्त्याने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement